Chess World Cup: प्रज्ञानंदची झुंज अपयशी! मॅग्नसन कार्लसन बनला चॅम्पियन

Chess World Cup: प्रज्ञानंदची झुंज अपयशी! मॅग्नसन कार्लसन बनला चॅम्पियन

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Magnus Carlsen Champion FIDE World Cup : भारताचा युवा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंदचे फिडे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. 5 वेळचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसनकडून अंतिम फेरीच्या टायब्रेकरमध्ये त्याचा 1.5-0.5 ने पराभव झाला. टायब्रेकरचा पहिला गेम नॉर्वेच्या खेळाडूने 47 चालीनंतर जिंकला. दुसरा गेम अनिर्णित राहिला आणि कार्लसन चॅम्पियन ठरला.

प्रज्ञानंदने अंतिम सामन्यात झुंझार खेळीचे प्रदर्शन केले. पण त्याला विजेतेपदाने हुलकावणी दिली. तब्बल 21 वर्षांनी भारतीय खेळाडूला या जागतिक स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची संधी होती. पण प्रज्ञानंदची झुंज अपयशी ठरली. यापूर्वी विश्वनाथन आनंदने 2002 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हा प्रज्ञानंदांचा जन्मही झाला नव्हता.

तत्पूर्वी, प्रज्ञानंदने मॅग्नसन विरुद्ध मंगळवारी पहिल्या आणि बुधवारी दुसर्‍या क्लासिकल फेरीतही बरोबरी प्राप्त केली होती. ज्यामुळे मॅग्नसन कार्लसनची कोंडी कायम राहिली. फायनलपूर्वी प्रज्ञानंदने आपले सर्व सामने टायब्रेकमध्ये जिंकले होते. पण अंतिम फेरीत त्याला आधीच्या कामगिरी पुनरावृत्ती करता आली नाही. कार्लसनने या स्पर्धेत अंतिम सामन्यासह 8 पैकी 6 सामन्यांत टायब्रेकमध्ये बाजी मारली आहे. (Magnus Carlsen Champion FIDE World Cup)

कार्लसनचे सहावे विजेतेपद

कार्लसन आता संयुक्त सर्वाधिक वेळचा चॅम्पियन आहे. याआधी त्याने 2013, 2014, 2016, 2018 आणि 2021 मध्ये ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली आहे. त्याने जर्मनीच्या इमॅन्युएल लस्कर (1894, 1896, 1907, 1908, 1910* आणि 1910) आणि रशियाच्या गॅरी कास्पारोव्ह (1985, 1986, 1987, 1990, 1993 आणि 1995) यांच्याशी चॅम्पियन म्हणून बरोबरी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news