राष्ट्रपती पदासाठी भाजपकडून एम. वेंकय्या नायडू यांच्या नावाची चाचपणी?

राष्ट्रपती पदासाठी भाजपकडून एम. वेंकय्या नायडू यांच्या नावाची चाचपणी?
Published on
Updated on

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा
आगामी राष्ट्रपती निवडणुकीत भाजप आघाडीकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. या पदासाठी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांच्या नावाची चाचपणी भाजपने सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवार निश्चितीच्या मुद्द्यावर विचारविनिमय करण्यासाठी भाजपने मंगळवारी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीपूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नायडू यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या. रालोआ आघाडीच्या उमेदवार निश्चितीसाठी विविध राजकीय पक्ष तसेच अपक्ष खासदारांशी चर्चा करण्याची जबाबदारी भाजपने नड्डा आणि राजनाथ सिंग यांच्यावर सोपविलेली आहे. विशेष म्हणजे, विरोधी आघाडीतील घटक पक्षांशी हे दोन नेते चर्चा करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news