SRH vs LSG : लखनौचा हैदराबादवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

SRH vs LSG
SRH vs LSG

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेरक मान्कंड आणि मार्कस स्टोयनिसची आक्रमक खेळी आणि कुणाल पंड्याच्या फिरकीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादवर ७ विकेट्सने विजय मिळवला. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. दरम्यान, हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत लखनौसमोर १८३ धावांचे आव्हान ठेवले. हैदराबादचे हे आव्हान लखनौने प्रेरक मान्कंड आणि मार्कस स्टोयनिसच्या आक्रमक खेळीच्या जोरावर १९.२ षटकामध्ये यशस्वीरित्या गाठले.

लखनौकडून क्विंटन डि कॉकने १९ चेंडूमध्ये २९ धावा, मार्कस स्टोयनिसने २५ चेंडूमध्ये ४० धावा, प्रेरक मान्कंड ४५ चेंडूमध्ये ६४ धावा आणि निकोलस पूरनने १३ चेंडूमध्ये ४४ धावांचे योगदान दिले. सनरायझर्स हैदराबादकडून ग्लेन फिलीप, मयांक मार्कंडे आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

तत्पूर्वी, सनराईजर्स हैदराबादकडून हेन्री क्लासिन २९ चेंडूमध्ये ४७ धावा, अब्दुल समद २५ चेंडूमध्ये ३७ धावा, अनमोलप्रित सिंगने २७ चेंडूमध्ये ३६ धावा, अॅडन मार्करम २० चेंडूमध्ये २८ धावा, राहुल त्रिपाठीने २० चेंडूमध्ये २८ धावांचे योगदान दिले. लखनौकडून कुणाल पंड्याने २ तर युधवीर सिंग, यश ठाकूर, अमित मिश्रा यांनी प्रत्येकी १ विकेट पटकावली.

हैदराबादचा संभाव्य संघ – अॅडन मार्करम (कर्णधार), हेन्रीख नौर्खिया (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलीप, अब्दुल समद, मार्को जेन्सन, विव्रांत शर्मा, मयांक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, अनमोलप्रित सिंग, आदिल रशिद, मयांक अग्रवाल, अकिल हुसेन, समर्थ व्यास, मयांक डगर, उपेंद्र यादव, हॅरी ब्रुक, कार्तिक त्यागी, सनवीर सिंग, फजल्क फारुकी, नितिश रेड्डी, उमरान मलिक

लखनौचा संभाव्य संघ – क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), कुणाल पंड्या (कर्णधार), कायल मेयर्स, दीपक हुड्डा, मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन, स्वप्निल सिंग, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसिन खान, आवेश खान, आयुष बदोनी, डॅनियल सॅम्स, अमित मिश्रा, परेक मनकड, युधिवीर सिंग चरक, मार्क वुड, रोमारीओ शेफर्ड, अप्रित गुलेरिया, करुण नायर, नवीन उल हक, मनन व्होरा, क्रिष्णाप्पा गौतम, करण शर्मा

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news