गॅस सबसिडी मिळते की नाही ? मग ‘या’ सोप्या मार्गाने मिळवा परत !

LPG Cylinder Price
LPG Cylinder Price
Published on
Updated on

मागच्या काही महिन्यांपासून देण्यात येणारी सिलिंडरची सबसिडी (LPG Subsidy ) बंद करण्यात आली होती. सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सामान्यांच्या खिशाला चांगलीच चाट लागली होती. दरम्यान, केंद्र सरकारकडून पुन्हा सबसिडी देण्यास सुरू करण्यात आली आहे.

एका सिलिंडर पाठीमागे ७९.२६ रुपये इतकी सबसिडी ग्राहकांच्या खात्यात जमा होत आहे. एलपीजी सिलिंडर सबसिडी जमा होत नसेल तर जाणून घ्या सोपी पद्धत…

LPG Subsidy : गॅस वितरकाशी संपर्क साधून सबसिडीबाबत माहिती घ्या

  • सध्या तुमच्या खात्यात सबसिडी जमा होत नसेल तर तुमच्या खात्याला एलपीजीचा आयडी क्रमांक जोडला गेला आहे का पहा.
  • जर तुमच्या खात्याला हा क्रमांक जोडला गेला नसेल तर तुमच्या खात्यात सबसिडी जमा होणार नाही.
  • यासाठी तुमच्या गॅस वितरकाशी संपर्क साधून याबाबत कल्पना द्या.
  • याचबरोबर 18002333555 या टोल फ्री नंबरवर कॉल करूनही तुमची तक्रार नोंदवू शकता.

एलपीजी गॅसची सबसिडीमध्ये काही नियम अटी घालून देण्यात आल्या आहेत. याचबरोबर एलपीजीची सबसिडी प्रत्‍येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या आहेत. वार्षिक १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणार्‍यांना या सबसिडी लाभ मिळत नाही. १० लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न पती-पत्नी दोघांची कमाई मिळून आहे.

किती मिळतेय सबसिडी?

सध्याच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडी खूपच कमी राहिली आहे. ग्राहकांना आता बँक अकाऊंटमध्ये सबसिडी म्हणून ७९.२६ रुपये मिळत आहेत. एकेकाळी २०० रुपयांपर्यंत सबसिडी मिळत होती, ती आता ७९.२६ रुपयांवर आली आहे. मात्र, काही ग्राहकांना १५८.५२ रुपये किंवा २३७.७८ (LPG Subsidy) सबसिडी मिळत आहे.

सबसिडी मिळवण्यासाठी ही आहे सोपी पद्धत

  • http://mylpg.in/ या संकेतस्थळावर जावा. यामध्ये तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक टाकावा लागले.
  • तुम्ही वापरत असलेल्या OMC LPG च्या आधारावर तुम्हाला आवश्यक माहिती द्या.
  • तुमचा १७ अंकी LPG आयडी एंटर करा आणि मोबाईल नंबर लिहा.
  • आता कॅप्चा कोड टाका आणि नेस्ट पेजवर क्लिक करा
  • तुम्ही एॅड केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
  • तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकून पासवर्ड तयार करावा लागेल.

ही सगळी प्रक्रिया पुर्ण झाल्यावर तुमच्या ईमेल आयडीवर एक लिंक येईल. तुमच्या मेलवर गेल्यानंतर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करावे लागेल. दरम्यान mylpg.in खात्यावर लॉगिन करा आणि पॉप अप मेसेजमध्ये तुमचे डिटेल्स टाइप करा.

View Cylinder Booking History/Subsidy Transfer या ऑप्शनवर क्लिक करा. तुमची सबसिडी सुरू आहे की बंद आहे याबाबत माहिती मिळेल.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news