मिशन ४०० पार साठी PM मोदी मैदानात; आज कर्नाटक, तेलंगणात करणार वादळी प्रचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुढारी ऑनलाईन ; आज लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार आहे. त्‍यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी वादळी प्रचारात उतरले आहेत. पंतप्रधान मोदी दक्षिणेतील राज्यांना संबोधित करण्यासाठी आज तेलंगणात आहेत. आज ते पहिल्‍यांदा नागरकुर्नुल मध्ये जनसभेला संबोधित करणार आहेत. यानंतर ते कर्नाटक मध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्‍लिकार्जुन खरगेंचा बालेकिल्‍ला गुलबर्ग मध्ये एका रॅलीला संबोधित करतील.

पक्ष आणि एनडीएच्या उमेदवारांसाठी मागत आहेत मते

पंतप्रधान मोदी गेल्‍या काही महिन्यांपासून दक्षिण भारतात दौरे करत आहेत. शुक्रवारीही ते तमिळनाडू, केरळ आणि तेलंगणाच्या दौर्‍यावर होते. या ठिकाणी त्‍यांनी रॅली आणि रोड शो केले आणि भाजप आणि एनडीएतील सहयोगी पक्षांसाठी मते मागितली. काल मोदींनी हैदराबादमध्ये रोड शो केला. यावेळी त्‍यांना पाहण्यासाठी लोकांमध्ये मोठा उत्‍साह दिसून आला.

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमांकडे पाहिले तर हे स्‍पष्‍ट होते की, त्‍यांचे लक्ष दक्षिणेतील जागांवर अधिक आहे. ते सलग दक्षिणेत रॅली करत आहेत. केरळमध्ये गेल्‍या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि एनडीएला आपले खाते उघडता आले नव्हते.

तामिळनाडूतही भाजपकडे सध्या एकही खासदार नाही. मात्र तेलंगाना मध्ये भाजपने २०१९ मध्यो चार लोकसभा जागा जिंकल्‍या होत्‍या. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे पारडे जड दिसत आहे. या वेळी त्‍यांनी २ जानेवारीपासून १६ मार्च पर्यंत २० राज्‍ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे दौरे केले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news