पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे ( हिंद स्वराज्य संघ) देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. एक लाख, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या 103 व्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमात मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. मुकुंदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात पुरस्कार वितरण होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे यंदाचे 41 वे वर्ष आहे, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
हे ही वाचा :