पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीसाठी रणधुमाळीला देशभरात सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. आता पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या बहुचर्चित खासदार महुआ मोइत्रा यांच्या विरोधात भाजपने बंगालमधील कृष्णनगर रॉयल पॅलेसच्या 'राजमाता' (राणी माता) अमृता रॉय यांना उभे केले आहे. या लढतीलकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. ( Lok Sabha Elections 2024 : Rajmata Amrita Roy VS Mahua moitra )
कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून राजमाता अमृता रॉय निवडणूक लढविणार आहेत. कृष्णनगर शहराला समृद्ध सांस्कृतिक आणि कलात्मक वारसा आहे. १८ व्या शतकामध्ये झालेले कृष्णचंद्र हे एक दूरदर्शी राजे म्हणून ओळखले जात. त्यांच्या ५५ वर्षांच्या राजवटीत त्यांनी केलेल्या प्रशासकीय आणि सामजिक सुधारणा, कलांचे संवर्धनाने राज्याच्या विकासात मोठा हातभार लावला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आजही या राजघराण्याला बंगालमध्ये विशेष प्रतिष्ठा आहे. ( Lok Sabha Elections 2024 : Rajmata Amrita Roy VS Mahua moitra )
अमृता रॉय या महाराजा रुद्र चंद्र रॉय आणि कृष्णचंद्र रॉय यांच्या नादिया राज घराण्याचे ३९ वे वंशज सौमिश चंद्र रॉय यांच्या पत्नी आहेत. सौमिश चंद्र रॉय हे एका विमान कंपनीचे निवृत्त कर्मचारी आहेत. तर त्यांचा मुलगा मनीष कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली करो. ला मार्टिनियर स्कूल आणि लोरेटो कॉलेजमध्ये वकिलीचे शिक्षण घेतलेल्या अमृता व्यवसायाने फॅशन सल्लागार आहे. त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांपैकी कोणाचाही राजकारणाशी पूर्वीचा संबंध नव्हता. 'पण, राजकारणात येण्याच्या माझ्या निर्णयातकुटुंबाने मला पाठिंबा दिला असल्याचे त्या सांगतात. ( Lok Sabha Elections 2024 : Rajmata Amrita Roy VS Mahua moitra )
या घराण्याच्या सून असणार्या अमृता रॉय यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्यासमोर मोठे आव्हान असेल, असे राजकीय विश्लेषक मानत आहेत. महुआ मोईत्रा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कृष्णनगर मतदारसंघातून 6,14,872 मते मिळवून विजयी झाल्या होत्या. यावेळी भाजपच्या कल्याण चौबे यांना 5,51,654 मते मिळाली होती. चोप्रा, पलाशीपारा आणि कालीगंज या तिन्ही विधानसभांतून त्यांना भरघोस मते मिळाली होती. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये कालीगंज विधानसभेत भाजपने आपला जनसंपर्क वाढवला आहे. त्यामुळे याचा फायदा अमृता रॉय यांना होईल असे मानले जात आहे.
निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी रिअल इस्टेट व्यावसायिक हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता. महुआ मोईत्रा यांनी संसदेत पैसे प्रश्न विचारले ( 'कॅश फॉर क्वेरी' ) अशी तक्रार १४ ऑक्टोबर २०२३ रोजी वकील जय आनंद देहादराई यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. याप्रकरणी संसदेच्या आचार समितीने चौकशी केली. याचा अहवाल लोकसभा अध्यक्षांना सादर केला. ८ डिसेंबर २०२३ रोजी महुआ यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. आता या संपूर्ण प्रकरणाचा आगामी लोकसभा निवडणुकीत तृणमूलच्या मतदानावर परिणाम होईल, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.