पुढारी ऑनलाईन : कल्याणमधून खासदार श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील. भाजप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि.६) केली. पण अद्याप काही जागांवर महायुतीमध्ये तोडगा निघालेला नाही. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. (Mahayuti seat sharing)
२०१९ मध्ये शिवसेनेने धनुष्यबाण चिन्हावर ज्या जागा लढवल्या होत्या; त्या जागांवर आमचा आग्रह कायम असल्याचे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे. कल्याणच्या जागेचा प्रश्न मिटला आहे. कल्याणची जागा महायुती ताकदीने लढणार असून तशी घोषणा फडणवीस यांनी केली. ठाण्याच्या जागेवर चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिव्ही पक्ष प्रमुख इतर जागांवर सन्मानजनक तोडगा काढतील. कोणाचीही नाराजी राहणार नाही. पक्षाची शिस्तबद्धता म्हणून कार्यकर्ते पक्षाचा आदेश पाळतील. पक्षाच्या आदेशाची अंमलबजावणी करतील, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला आहे.
वरिष्ठ नेतृत्त्वात निर्णय झाला की खालच्या कार्यकर्त्यांची नाराजी राहणार नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे शिस्तबद्ध पक्ष आहेत. स्वतःच्या ताटात आधी वाढून घ्यायचे आणि दुसऱ्याचे ताट मोकळे ठेवायचे ही शिवसेनेच्या कामाची पद्धत नाही. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी पक्ष आधीच जाहीर करु शकला असता. पण तसे केले नाही. मागील अडीच वर्षे एकाच कुटुंबातील मोठे नेतृत्त्व काम करत होते. त्यांचे युवराज पहिल्याच यादीत मंत्रिमंडळात आले. पण आता आधी कार्यकर्त्यांचा विचार केला जातो, असा टोला शंभूराज देसाई यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरेंना लगावला.
तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते नेते एकत्र बसतील आणि सगळ्या जागांवर सन्मानजनक तोडगा काढतील. कोणाचाही नाराजी राहणार नाही. आग्रह धरणे कार्यकर्त्यांचे काम आहे. पण वरिष्ठ नेते त्यावर तोडगा काढतील. ज्या जागा राहिल्या आहेत तिथेही सन्मानजनक तोडगा निघेल, असेही ते म्हणाले. (Mahayuti seat sharing)
हे ही वाचा :