south actors vote Lok Sabha Elections 2024 : दाक्षिणात्य सुपरस्टार्सनी बजावला मतदानाचा हक्क, थलापती विजयला करावी लागली तारेवरची कसरत (Video)

सुपरस्टार रजनीकांत-थलापती विजय-धनुष-त्रिशा कृष्णन
सुपरस्टार रजनीकांत-थलापती विजय-धनुष-त्रिशा कृष्णन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, कमल हासन, थलापती विजय, धनुष, अभिनेत्री त्रिशा कृष्णन, अभिनेता सूर्या, कार्थी यांच्यासह इतर कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. (south actors vote Lok Sabha Elections 2024 ) याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोकसभा निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. आज देशातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील १०२ मतदान केंद्रांवर मतदार आपले मतदान करत आहेत. (south actors vote Lok Sabha Elections 2024)

साऊथ सुपरस्टार अजित कुमार १९ एप्रिल रोजी सकाळी तिरुवन्मियूरमध्ये मतदान केले.

सुपरस्टार रजनीकांत यांनी मतदान केंद्रावर बोटावर शाई लावलेली दाखवत कॅमेरापर्सनना पोज दिली.

अभिनेता सूर्या, कार्थी, शिवकार्तिकेयन, अभिनेत्री त्रिशा कृष्णन, अभिनेता धनुष यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी थलापती विजयला चाहत्यांच्या गर्दीतून वाट काढत मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.

अभिनेता कमल हासन यांनी चेन्नईमध्ये एका मतदान केंद्रावर मतदान केले.

ते एमएनएम पार्टीचे प्रमुख आहेत. ते लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. त्यांच्या पक्षाने डीएमकेचे समर्थन केले आहे.

थलापतीला मतदान केंद्रापयर्यंत जाण्यासाठी अशी तारेवरची कसरत करावी लागली. त्याच्याभभोवती चाहते, मीडियाची प्रचंड गर्दी होती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news