Lok Sabha Election 2024 | मोदींच्या सभेसाठी नाशिकच्या पिंपळगावला जय्यत तयारी

पिंपळगाव बसवंत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी उभारण्यात येत असलेला मंडप.
पिंपळगाव बसवंत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी उभारण्यात येत असलेला मंडप.

पिंपळगाव बसवंत(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. बुधवारी (दि. १५) दुपारी 2 वाजता होणाऱ्या या सभेसाठी पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सात एकर मैदानावर या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024)

येथील जोपूळ रोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्य मुख्य आवारात भव्य सभामंडप उभारणी करण्यात येत आहे. मुख्य मंडप व त्याला लागून दोन उपमंडप अशा पद्धतीने सभामंडप उभारणी सुरू आहे. या मंडपात 40 बाय 100 फूट लांबीचे आणि आठ फूट उंचीचे भव्य व्यासपीठ साकारले जात आहे. Lok Sabha Election 2024

मंडप उभारणीसाठी संपूर्ण स्टीलचा वापर करण्यात येत असून, हे स्टील मुंबई येथून आणण्यात आले आहे. या मंडपाच्या उभारणीसाठी राजस्थान, बिहार, मुंबई येथील शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. भव्य मंडपासाठी लोखंडी बार उचलण्यासाठी चार पोकलँड तैनात करण्यात आले आहेत. आठ ते दहा हजार लोक सामावण्याची क्षमता या सभामंडपाची असून या ठिकाणी सोमवारी हेलिकॉप्टर लँडिंगची चाचणी घेण्यात आली.

आक्रमक शेतकऱ्यांचा घेतला धसका (Lok Sabha Election 2024)

कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी आक्रमक झालेले असल्यामुळे उभारणी कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी सभामंडप परिसरात बॅरिकेड टाकण्यात येत आहेत. कामामध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून बंदूकधारी पोलिसदेखील तैनात करण्यात आले आहेत. पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्तात काम सुरू आहे. या कामात कोणताही अडथळा येऊ नये याची शासन स्तरावरून विशेष दक्षता घेण्यात आली आहे.

सभेसाठी कांदा लिलाव बंद

नरेंद्र मोदी यांची सभा ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणी दररोज कांदा लिलाव केला जातो. मात्र सभेसाठी दि. 14 आणि 15 मे या दोन्ही दिवशी कांदा लिलाव बंद ठेवण्यात आलेले आहेत.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news