लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यातील मतदानास सुरवात, जळगाव मध्ये जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यातील मतदानास सुरवात, जळगाव मध्ये जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुक – २०२४ चे चौथ्या टप्प्यातील मतदान आज सोमवार (दि. १३) रोजी पार पडत असून यामध्ये जळगाव, नंदुरबार, रावेर लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. तर सकाळपासूनच मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर हजेरी लावत आहेत. जळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील आज सकाळी 7.40 वाजता सेंट जोसेफ स्कुल मध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

भुसावळ येथील इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी मतदान केंद्र क्रमांक 112 या ठिकाणी सुरुवातीलाच मशीन बंद पडली त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी वोटिंग मशीन बदलून पुन्हा मतदान सुरू केले आहे. तर भुसावळ तालुक्यामध्ये पाच मशीन रिप्लेसमेंट करण्यात आलेल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील 1845 केंद्रावरून वेबकास्टिंग सुरु…
जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण 3886 मतदान केंद्र आहेत. त्यातील 1845 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग सुरु असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्प बचतभवन सभागृहात मोठमोठ्या सहा स्क्रीनवर हे मतदान प्रक्रीया लाईव्ह दाखविले जात आहे. मतदान केंद्रावरील मतदानाची गुप्तता सोडून मतदान केंद्रावर काय सुरु आहे हे अल्पबचतभवन मध्ये बसून टिपले जात आहे. तिथे अधिकारी आणि कर्मचारी त्याची पाहणी करत आहेत.

अल्पबचतभवनचे चित्र पालटले
अल्पबचत भवन मधले सगळे फर्निचर काढून येथील मोठ्या हॉल मध्ये एका बाजूला तीन आणि दुसऱ्या बाजूला तीन असे भव्य स्क्रीन उभे करण्यात आलेले आहेत. त्यावर रावेर लोकसभा आणि जळगाव लोकसभा क्षेत्रातील जवळपास 50 टक्के मतदान केंद्रावरून वेब कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. मतदान केंद्रावर काहीही झाले तर तत्काळ मदत पोहचवता यावी, कायदा, सुव्यवस्था राखली जावी, मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे म्हणूनही ही सुविधा उपयोगी पडत आहे.

लोकशाहीचा उत्सव साजरा करताना अशोक भाऊ जैन समवेत सौ. ज्योती जैन.
लोकशाहीचा उत्सव साजरा करताना अशोक भाऊ जैन समवेत सौ. ज्योती जैन.

अशोक भाऊ जैन समवेत सौ. ज्योती जैन यांनी देखील सकाळी 7 ला मतदानाचा हक्क ओरियन शाळेत बजावला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news