लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र?

लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र?
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका होतात. मात्र, लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या हालचाली सुरू असून राज्य निवडणूक विभाग त्यासाठी तयारीला लागल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या आदेशामुळे तसे संकेत मिळाल्याचे सांगितले जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनंतर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी आदेश जारी केले आहेत. ज्यात त्या त्या जिल्ह्यातील निवडणूक शाखांमधील कर्मचार्‍यांना निवडणुकीव्यतिरिक्त अन्य कोणतीच कामे देऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक विभागातील सर्वच कर्मचारी – अधिकारी सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागले आहेत. तसेच या काळात त्यांच्याकडे इतर कोणतीही इतर कामे दिली जात नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोग लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे 2024 मध्ये होणार्‍या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीसाठी सर्व जिल्ह्यांतील निवडणूक शाखेतील अधिकारी, कर्मचार्‍यांना निवडणुकीसंदर्भातील कामांशिवाय अन्य कामे देऊ नका, असे आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत.

दरम्यान, 2024 मध्ये लोकसभेची आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष तयारी करत आहे. राज्यातील एकंदरीत चित्र पाहता लोकसभेबरोबर विधानसभेचीही निवडणूक होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news