Lionel Messi vs Referee : मेस्सीला भिडणाऱ्या रेफरीला फिफाचा दणका, उर्वरीत सामन्यातून हकालपट्टी!

Lionel Messi vs Referee : मेस्सीला भिडणाऱ्या रेफरीला फिफाचा दणका, उर्वरीत सामन्यातून हकालपट्टी!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lionel Messi vs Referee : फिफा विश्वचषक स्पर्धेतील अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया या पहिल्या उपांत्य सामन्यापूर्वी मोठा वाद निर्माण झाला आहे. स्पर्धेतील स्पेनचे वादग्रस्त रेफरी माटेयू लाहोज यांची वर्ल्ड कपमधून हकालपट्टी करण्यात आली असून अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या तक्रारीनंतर लाहोज यांच्या विरोधात फिफाने ही कारवाई केली आहे.

अर्जेंटिना आणि नेदरलँड यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्यात माटेयू लाहोज हे मुख्य रेफरी होते. या सामन्यावेळी त्यांनी अनेक चुकीचे निर्णय दिले. लाहोज यांनी त्या सामन्यात एकूण 15 पिवळे कार्ड दाखवले. त्यापैकी एक लिओनेल मेस्सीलाही दाखवण्यात आले. एवढेच नाही तर रेफरी लाहोज यांच्या अनेक चुकीच्या निर्णयांमुळे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये भर मैदानात खडाजंगी झाली. सामना संपल्यानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीने पुढाकार घेत लाहोज यांच्या कारनाम्याचा थेट फिफासमोर पाढा वाचला. मेस्सी म्हणाला की, मला रेफरींबद्दल चर्चा करायची नाही. कारण तुम्ही जर रेफरींसंदर्भात काही बोललात तर तुमच्यावर ॲक़्शन घेतली जाऊ शकते. पण फिफाने अशा रेफरींबाबत विचार करायला हवा, कारण जे काम करण्यासाठी योग्यता नाही त्याला तुम्ही अशा ठिकाणी रेफरी म्हणून जबाबदारी देऊ शकत नाही. (messi vs referee fifa took action spanish referee mateu lahoz sent home)

फिफानेही या प्रकराणात गंभीर दखल घेत लाहोज यांच्यावर कारवाई बडगा उचलला आणि विश्वचषकातील उर्वरित चार सामन्यांमध्ये त्यांना कसली जबाबदारी न देता कट्ट्यावर बसचले आहे. स्पर्धेत अजून दोन सेमीफायनल, तिसर्‍या क्रमांकाचा आणि अंतिम सामना असे एकूण चार सामने बाकी आहे.

अर्जेंटिना आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना निर्धारित आणि अतिरिक्त वेळेत 2-2 बरोबरीत सुटल्यानंतर या सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. ज्यात अर्जेंटिनाने 4 विरुद्ध 3 गोल फरकाने विजय मिळवून सलग दुस-यांना सेमीफायनलचे तिकीट मिळवले. आता उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर क्रोएशियाचे आव्हान आहे असून याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. मेस्सीची ही शेवटची जागतिक स्पर्धा आहे, त्यामुळे विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी अंतिम फेरी गाठण्याआधी त्याच्या संघाला गत उपविजेत्या क्रोएशियाचा अडथळा पार करणे महत्त्वाचे ठरणार आहे. (messi vs referee fifa took action spanish referee mateu lahoz sent home)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news