‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ सेटवर बिबट्याचे दर्शन

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसला
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसला

मुंबई (जोगेश्वरी) : पुढारी वृत्तसेवा – गोरेगाव ( दादासाहेब फाळके चित्रनगरी) फिल्म सिटीमध्ये मराठी मालिकेचे शूटिंग सुरू असताना सेटवर बिबट्या आल्याची घटना घडली. बिबट्याला पाहताच सेटवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ जीव वाचवण्यासाठी बाहेर धाव घेतली.

बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास मराठी मालिकेचा "सुख म्हणजे नक्की काय असतं'" या सेटवर शूटिंग सुरू असताना बिबट्या सेटवर शिरला.

संध्याकाळी चारच्या सुमारास "सुख म्हणजे नक्की काय असतं" या मराठी मालिकेच्या सेटवर १०० ते १५० लोक शूटिंग मध्ये मग्न होते. अचानक सेटवर बिबट्या घुसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

मागील दहा दिवसांमध्ये तीन ते चार वेळा सेटवर शूटिंग सुरू असताना बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. दररोज मालिकेच्या सेटवर जवळपास २०० कर्मचारी शूटिंग असतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. राज्य शासनाने बिबट्यापासून संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत ऑल इंडियन साईन वर्कर्स असोसिएशन यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news