पुढारी ऑनलाईन डेस्क : द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईममध्ये थलापति विजयसोबत लिओ फेम साऊथ अभिनेत्री त्रिशा झळकणार आहे. (Trisha : The Greatest of All Time ) या दोन्ही स्टार्सचा डान्स पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. व्यंकट प्रभू हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटामध्ये मिनाक्षी चौधरी ही मुख्य भूमिकेत अभिनेत्री म्हणून असेल. (Trisha : The Greatest of All Time )
मीडिया रिपोर्टनुसार, तिचा हा कॅमियो असेल. एजीएस एंटरटेनमेंच बॅनरखाली अर्चना कलापती, कलापती एस अघोरम, कलापती एस गणेश, कलापती एस सुरेश हे चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
विजय आणि मीनाक्षी सोबत, चित्रपटात जयराम, स्नेहा, लैला, योगीबाबू, व्हीटीव्ही गणेश, अजमल अमीर, माईक मोहन, वैभव, प्रेमगी, अजय राज आणि अरविंद आकाश यासह अन्य तगडे सहाय्यक कलाकार आहेत. चित्रपटाचे संगीत युवन शंकर राजा यांनी दिले आहे.