वकील, पक्षकारांना आता व्हॉटस्अ‍ॅपवर मिळणार अपडेट; सर्वोच्च न्यायालयात लवकरच प्रारंभ

वकील, पक्षकारांना आता व्हॉटस्अ‍ॅपवर मिळणार अपडेट; सर्वोच्च न्यायालयात लवकरच प्रारंभ

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सर्वोच्च न्यायालयाच्या माहिती तंत्रज्ञान सेवेचे व्हॉटस्अ‍ॅपशी संलग्नीकरण करण्यात आले असून त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि पक्षकारांना खटल्यांच्या तारखा व इतर बाबतीतील अपडेट मिळणार आहेत.

गुरुवारी 9 सदस्यीय घटनापीठाचे कामकाज सुरू होण्याआधी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा छोटा उपक्रम हाती घेण्यात आला असला तरी त्याचा परिणाम खूप मोठा होणार आहे. व्हॉटस्अ‍ॅप हे आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहे. ते संवादाचे एक शक्तिशाली माध्यम आहे. त्याचाच वापर सर्वोच्च न्यायालयाच्या डिजिटल कामकाजासाठी केला जाणार आहे. न्याय यंत्रणेत न्यायाचा हक्क आणि पारदर्शकता ही तत्त्वे मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची माहिती तंत्रज्ञान यंत्रणा आणि व्हॉटस्अ‍ॅप यांचे संलग्नीकरण करण्यात आले आहे. 87687676 हा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकृत क्रमांक असून त्या माध्यमातून एकेरी संवाद करता येईल. त्यावर कॉल अथवा प्रत्युत्तरात संदेशाची देवाणघेवाण होणार नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news