देशातील पहिले ‘मधाचे गाव’ प्रकल्पाचा मांघर गावी शुभारंभ

देशातील पहिले ‘मधाचे गाव’ प्रकल्पाचा मांघर गावी शुभारंभ

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या देशातील पहिले 'मधाचे गाव'  म्हणून महाबळेश्वर तालुक्यातील मांघर या गावाची निवड करण्यात आली होती. या प्रकल्पाचा शुभारंभ आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते व उद्योग व जनसंपर्क राज्यमंत्री  अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

यावेळी आ. मकरंद पाटील यांच्यासह राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या श्रीमती अंशू सिन्हा, उद्योग विभागाचे अप्पर सचिव बलदेव सिंह, उपमुख्य कार्यकरी अधिकारी बिपीन जगताप, महाबळेश्वर मध संचालनाचे संचालक दिग्विजय पाटील, मांघर गावाच्या सरपंच यशोदा जाधव आदी मान्यवर उपस्‍थित होते.

मांघर देशातील पहिले 'मधाचे गाव'

देशातील पहिले पुस्तकाचे गाव अशी महाबळेश्वर तालुक्यातील 'भिलार' या गावाची ओळख आहे अशीच ओळख आता देशातील पहिले मधाचे गाव म्हणुन तालुक्यातील मांघर या गावाची ओळख देशभर होणार आहे. या कार्यक्रमास पंचायत समितीचे मा. सभापती संजय गायकवाड, वाई तहसिलदार रणजितसिंह भोसले, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी, पो. नि. संदीप भागवत, महादेव जाधव, डी. एम. बावळेकर, विमलताई पार्टे, श्रध्द रोकडे आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news