सातारा : मांढरदेव येथील काळूबाई देवीच्या यात्रेसाठी लाखो भाविक दाखल (व्हिडीओ)

सातारा : मांढरदेव येथील काळूबाई देवीच्या यात्रेसाठी लाखो भाविक दाखल (व्हिडीओ)

पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील काळूबाई देवीच्या यात्रेला कालपासून सुरुवात झाली आहे. आज शुक्रवारी दुसऱ्या शाकंभरी पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ६ वाजता जिल्हा प्रमुख न्यायाधिश आणि ट्रस्टच्या अध्यक्ष मंगला धोटे यांच्या हस्ते देवीची शासकीय पूजा पार पडली.

राज्यभरातून लाखो भाविक मांढरदेव येथे आई काळुबाईच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रा काळात कोंबडे, बकरे कापण्यास आणि अघोरी प्रकार करण्यास मनाई करण्यात आली. देवीला ६८२ ग्रॅम सोन्याचा मुखवटा आणि १७ तोळे वजनाचे नवीन दागिने ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहेत. भाविकांनी दिलेलं सोन्याचं दान वितळवून ही आभूषणे तयार केली आहेत.

मुख्य प्रशासक सौ मंगला धोटे, ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नंदीमठ, तहसीलदार रणजित भोसले, उपविभागीय अधिकारी शीतल जानव्हे खराडे, ट्रस्टी अतुल जोशी, पद्माकर पवार, माणिक माने, ओंकार क्षीरसागर, चंद्रकांत मांढरे, सुधाकर क्षीरसागर, विजय मांढरे, सुनील मांढरे, पुजारी सोमनाथ क्षीरसागर उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news