रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरण : चित्रा वाघ म्हणाल्या, ‘आता मला अडकवण्याचा प्रयत्न’

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात आणि समाजकारणात काम करत असताना विविध अनुभव येत असतात. याचे उत्तर देण्यासाठी मी आलो आहे. पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी मला तिचा फोन आला. तिच्या घटनेचा सगळा वृत्तांत ऐकून मी तिला साथ देण्याचे ठरवले. मी जर तिच्यावर दबाब आणण्यास भाग पाडलं असेल तर यावर मी आणखी काय बोलू? असे चित्रा वाघ म्हणाल्या.

मला पोलीस ठाण्यात त्रास देतात असेही ती मला म्हणाली होती. त्या मुलीच्या उपचारासाठी मदत केली. आमच्या डॉक्टरांनी तिला मदत केली तिच्या सोबत कोण नव्हतं यावेळी मी तिला मदत केली पण आज ती मुलगी माझ्याविरोधात बोलत आहे. असे वाघ म्हणाल्या.

कुचिक बलात्कार प्रकरण : विद्या चव्हाण या डोक्यावर पडलेल्या आहेत

मी जर तिच्यावर दबाब आणण्यास भाग पाडलं असेल तर यावर मी आणखी काय बोलू? ती हे का बोलते आहे? हेच मला कळत नाहीए. विद्या चव्हाण या डोक्यावर पडलेल्या आहेत, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मी बलात्काऱ्यांना पाठीशी घालते, असे आरोप माझ्यावर झाले होते, मग त्यावेळी कोण पुढे का आले नाही ? या प्रकरणी मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. कसल्या प्रकारचे गंभीर आरोप माझ्यावर झालेत मला तर काहीच समजत नाहीए.

ती माझ्या विरोधात बोलायला सुरू केल्यावर लगेच तिच्या पाठीशी राहतात हा काय प्रकार आहे. मला अशा पद्धतीने करायला लावलं असे ती मुलगी सांगताच तिच्या बाजून उभे राहणारे तिला माझ्याविरोधात तक्रार करायला लावतील. सरकारच्या माध्यमातून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करून मी शांत बसेल असे वाटत असे तर तो त्यांचा गैरसमज आहे. असे चित्रा वाघ म्हणाल्या.

ती मुलगी जे काही सांगत आहे ते सगळे तपासणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी मला चौकशीसाठी बोलवाल त्याठिकाणी मी येण्यास तयार असल्याचे वाघ म्हणाल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news