Kriti Sanon : आदिपुरुषचे काळजाला भिडणारे पोस्टर; फॅन्स म्हणाले…

kriti sanon Adipurush look
kriti sanon Adipurush look

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार प्रभास आणि कृती सेनॉन स्टारर आदिपुरुष १६ जून, २०२३ रोजी रिलीज होणार आहे. ज्यामुळे चित्रपटाचे स्टार्स नवे नवे मोशन पोस्टर शेअर करताना दिसत आहेत. परंतु, फॅन्स हे पोस्टर्स पाहून कमेंट देत आहेत. ट्रेलर रिलीज करण्याची मागणी करत आहेत. आता जानकी सीता माता मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. ऑडिओ मोशन पोस्टर असलेला आदिपुरुषचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. यामध्ये प्रभासचं नाही तर कृती सेनॉनदेखील दिसत आहे. व्हिडिओमध्ये राम सीया रामा नामाचा जयघोष ऐकू येतो.

कृती सेनॉनने काही दिवस आधी एक ऑडिओ व्हिडिओ टीजर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सीता माताच्या भूमिकेत ती दिसतेय. तर प्रभास धनुष्य हातात घेत प्रभू राम यांच्या भूमिकेत दिसत आहे. कृतीने व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, सीता राम चरित अति पावन. सिया रामाचा पवित्र गाथा. त्यापुढे वेगवेगळ्या भाषेत जय सिया राम लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news