Kriti Kharbanda-Pulkit Samrat : लग्नानंतर क्रिती- पुलकितचा भन्नाट डान्स

Kriti Kharbanda-Pulkit Samrat
Kriti Kharbanda-Pulkit Samrat

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिती खरबंदा आणि अभिनेता पुलकित सम्राट यांचा ( Kriti Kharbanda-Pulkit Samrat ) विवाह सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. दोघांच्या शाही लग्नाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पुलकित-क्रितीनं मानेसरमध्ये लग्नगाठ बांधली. आता या जोडप्यावर सिनेसृष्टीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता लग्नानंतर क्रितीचा सासरी थाटामाटात गृहप्रवेश झाला. लग्नाच्या वरातीत या जोडप्यानं भन्नाट डान्स केल्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

संबंधित बातम्या 

यामध्ये दोघंही डान्स करत असल्याचं दिसून येत आहे. लग्नानंतर क्रिती सुंदर साडी नेसून, भांगत कुंकू भरून, हातात लाल रंगाचा चुडा अशा लूकमध्ये माध्यमांसमोर आली होती. नवऱ्यासह जबरदस्त डान्स केल्यावर या दोघांनी जोडीनं गृहप्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून क्रिती-पुलकितच्या लग्नाची चर्चा सुरू होती.

अखेर लग्न सोहळ्याचे फोटो पोस्ट करत क्रितीनं आनंदाची बातमी दिली आहे. लग्नात क्रितीनं बेबी पिंक रंगाचा लेहेंगा, तर पुलकितनं मिट ग्रीन रंगाची शेरवानी घातला होता. ( Kriti Kharbanda-Pulkit Samrat )

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news