Nayanthara : नयनताराला चांगले दिवस; ५० सेकंदांच्या जाहिरातीसाठी तब्बल ५ कोटींचं मानधन ! | पुढारी

Nayanthara : नयनताराला चांगले दिवस; ५० सेकंदांच्या जाहिरातीसाठी तब्बल ५ कोटींचं मानधन !

पुढारी ऑनलाईन डेस्क : एरव्ही महागड्या तारकांमध्ये आलिया भट्ट, करिना कपूर, कॅटरिना कैफ, समांथा या चित्रपट, जाहिराती, विविध करारांच्या माध्यमातून कित्येक कोटींची कमाई करत आल्या आहेत; पण एक अभिनेत्री अशीही आहे, जी आताही सर्वाधिक महागडी अभिनेत्री म्हणून नावारूपास येत आहे. नयनतारा ( Nayanthara ) या दाक्षिणात्य अभिनेत्रीला सर्वात महागडी अभिनेत्री मानलं जातं आणि त्यात बरंच तथ्यही आहे.

संबंधित बातम्या 

एरव्ही ती ( Nayanthara ) एका नित्रपटासाठी ११ कोटी रुपये मानधन येते. अलीकडेच एका ५० सेकंदांच्या जाहिरातीसाठी तिनं थोडंथोडकं नव्हे, तर चक्क ५ कोटींचं मानधन घेत आणखी एक उच्यांक नोंदवला आहे. पार्टटाईम मंडिल आणि टीव्ही सूत्रसंचालक या नात्यानं कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नयनतारानं मल्याळी चित्रपट ‘मनाहिसनाकरे’ मधून पदार्पण केलं. हा चित्रपट यशस्वी ठरला.

शिवाय, तिची अभिनयातील चुणूकही दिसून आली. नयनतारानं दिग्दर्शक विनेश शिवनशी विवाह केला असून, जुळी मुलंही आहेत. सरोगेसीच्या माध्यमातून ती आई झाली. अलीकडेच तिनं व्यावसायिक करारांतर्गत ५० सेकंदांच्या जाहिरातीसाठी ५ कोटींचं मानधन घेतले. ही जाहिरात तामिळ, तेलगू, मल्याळी व कन्नड वा भाषांमधून प्रदर्शित झाली.

Back to top button