Kozhikode train fire incident : केंद्रीय आणि राज्य तपास यंत्रणेची मोठी कारवाई; केरळ रेल्वे जळीतकांडातील संशयिताला रत्नागिरीतून अटक

kerala: Kozhikode train fire incident
kerala: Kozhikode train fire incident

पुढारी ऑनलाईन : केरळमधील कोझिकोडमधील एलाथूरजवळ चालत्या ट्रेनमध्ये एकाने आपल्या सहप्रवाशाला पेटवून दिले होते. यामध्ये जळलेल्या व्यक्तीसोबतच आठ सहप्रवासी जखमी झाले होते. यातील तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पोलिसांना एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान, या कोझिकोड रेल्वे आगीच्या घटनेतील एका संशयिताला पोलिसांनी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथून अटक केली आहे.

केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र एटीएसच्या संयुक्त पथकाने कोझिकोड रेल्वे आगीच्या घटनेतील फरार संशयित आरोपीला महाराष्ट्रातील रत्नागिरी येथून जेरबंद केले आहे. केरळ पोलिसांचे एक पथकही रत्नागिरीत पोहोचले असून, आरोपीला लवकरच त्यांच्या ताब्यात दिले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसने दिली आहे.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, कोझिकोड ट्रेन आग प्रकरणातील संशयित आरोपी शाहरुख सैफी याला केरळ पोलिसांच्या ताब्यात दिली असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोझिकोड रेल्वे आगीच्या घटनेवर बोलताना, हा भयंकर गुन्हा करणाऱ्याला महाराष्ट्रातील रत्नागिरीत अटक करण्यात आली आहे. मी महाराष्ट्र सरकार, पोलिस आरपीएफ जवान आणि एनआयएचे आभार मानत असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Kozhikode train fire incident: दहशतवादी कट असण्याचा पोलिसांना संशय

केरळमधील कोझिकोडमधील एलाथूरजवळ चालत्या ट्रेनमध्ये रविवारी (दि.०२) रात्री एकाने आपल्या सहप्रवाशाला पेटवून दिले. यामुळे अलप्पुझा-कन्नूर एक्स्प्रेस रेल्वेच्या D1 डब्यात आग लागल्याने ही धक्‍कादायक घटना घडली. या घटनेनंतर रेल्वे रुळावर एक बॅगही सापडली असून, ही बॅग आरोपींची आहे का? की यामागे अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. हा दहशतवादी कट देखील असू शकतो, असा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. सध्या तरी या घटनेला माओवादी किंवा दहशतवादी बाजू असू शकते, हे नाकारू शकत नसल्याचा संशय केरळचे पोलीस महासंचालक अनिल कांत यांनी म्‍हटले आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, घटनेदरम्यान प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढल्यानंतर रेल्वेचा वेग कमी झाला, तेव्हा संबंधित संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला. यानंतर इतर प्रवाशांनी रेल्वे संरक्षण दलाला (आरपीएफ) माहितीनंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग तातडीने आटोक्यात आणली. जखमींपैकी काही व्यक्तींनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोराने पेट्रोल किंवा रॉकेल असे ज्वलनशील पदार्थ शिंपडले आणि आग लावली. एका महिला प्रवासी म्‍हणाली की, तिला पाण्याचे थेंब तोंडावर पडल्यासारखे वाटले. यानंतर अचानक आगीचा भडका उडाला. जेव्हा ट्रेन एलाथूर पुलावर पोहोचली तेव्हा ती थांबली आणि प्रवासी घाबरून एका डब्यातून बाहेर पडताना दिसले. दरम्यान या घटनेनंतर रेल्‍वेतील एकच खळबळ उडाली. प्रवशांमध्‍ये चेंगराचेंगरी झाली असल्याची माहिती अन्य सहप्रवाशांनी दिली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news