कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला ‘महाराष्ट्र केसरी’!

कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला ‘महाराष्ट्र केसरी’!
Published on
Updated on

सातारा, पुढारी वृत्तसेवा : Maharashtra Kesari : साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात ६४ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला आहे. अंतिम लढतीत महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने उचलली. तो प्रदार्पणातच महाराष्ट्र केसरी ठरला. त्याने अंतिल लढतीत मुंबईच्या विशाल बनकरला मात दिली.

साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने मुंबईचा विशाल बनकर याचा 5-4 असा पराभव केला. पहिल्या राऊंड मध्ये बनकर याने 4 गुणांची बढत घेतली होती. पण ही आघाडी मोडून पृथ्वीराज पाटील याने आक्रमक खेळ करत 5 गुण घेतले. पृथ्वीराज हा प्रथमच या स्पर्धेसाठी उतरला होता. आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने चंदेरी गदा पटकावली.

शुक्रवारी वळवाच्या पावसाने तडाखा दिल्यानंतर शनिवारी सकाळी सेमी फायनल चे सामने झाले. यामध्ये माती गटात विशाल बनकर याने महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांना चितपट करून मुख्य स्पर्धेसाठी दावेदारी केली. तर पृथ्वीराज पाटील याने अक्षय शिंदे आणि हर्षल कोकाटे यांचा पराभव करत मुख्य स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला आहे.

पृथ्वीराज पाटीलने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news