कोल्‍हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (शुक्रवार) करवीर निवासीनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. दरम्यान, मंत्री शहा यांनी मुक्कामस्थळी कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघातील परिस्थितीची सविस्तर माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच निवडणूकी संदर्भात महत्वपूर्ण सूचना दिल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गृहमंत्री आपल्या ताफ्यासह अंबाबाई मंदिराच्या दक्षीण दरवाजातून दाखल झाले. त्यांचे स्वागत देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर-देसाई व सहकाऱ्यांनी केले. यावेळी खा. धनंजय महाडिक, प्रदेश भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकोडे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, तुषार देसाई, अमित हुक्केरीकर व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दर्शन घेवून मंत्री शहा लगेचच पुढील प्रवासासाठी विमानतळाकडे रवाना झाले.

प्रचार मतदाना दिवशी ईव्हीएम सील होईपर्यंत सुरु ठेवा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याबद्दल माध्यमांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, निवडणूकीचा प्रचार ५ मे रोजी ५ वाजता थांबणार असला तरी आपला महायुतीचा प्रचार दि. ७ मे रोजी मतदान पूर्ण होवून ईव्हीएम मशीन सील होईपर्यंत सुरु ठेवावा. उन्हाच्या तडाख्यामुळे या अधिच्या तीन फेऱ्यांमध्ये मतदानाची संख्या कमी झाली असल्याने पुढील मतदानावेळी सकाळी ७ ते १० यावेळेत अधिकाधिक मतदान होईल. यासाठी प्रयत्न करावेत अशा महत्वपूर्ण सूचना मंत्री शहा यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

शुक्रवारी सकाळी कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघाचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने, समरजीतसिंह राजेघाटगे यांच्या सर्व मित्र पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेतला. कोणा-कोणाच्या प्रचार सभा झाल्या. मतदार संघाची पूर्वीची आणि सद्याची परिस्थती या विषयीची माहिती त्‍यांनी घेतली. सहकार, कृषी, राजकारणासह राज्य व देशातील परिस्थिती संदर्भात माहिती घेतली. कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघातील उमेदवारांना अधिकाधिक मताधिक्याने विजयी करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्री शहा यांनी केले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news