कोल्हापूर : पन्हाळ्यात लॉजवर छापा; वेश्याव्यवसाय चालविणार्‍या एजंटसह दोघांना अटक

कोल्हापूर : पन्हाळ्यात लॉजवर छापा; वेश्याव्यवसाय चालविणार्‍या एजंटसह दोघांना अटक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा येथे हॉटेल रसना गार्डनवर छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालविणार्‍या एजंट भगवान पांडुरंग भाकरे (वय 45, हॉटेल रसना लॉजिंग बोर्डिंग गार्डन) व शुभम झुंझारराव जाधव (26, रा. मणेरमळा, उचगाव) या दोघांना अटक केली.

महिलेच्या आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेऊन तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले होते. संबंधित महिलेची पोलिसांनी सुटका केली. या दोघांकडून एक मोटारसायकल, मोबाईल असा सुमारे 32 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. बुधवारी (दि. 13) ही कारवाई करण्यात आली. दोघा आरोपींना न्यायालयाने 18 मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

पन्हाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश इंगळे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, सहायक फौजदार राजेंद्र घारगे, अभिजित घाटगे, रफिक आवळकर, अश्विनी पाटील, तृप्ती सोरटे आदींनी कारवाई केली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news