कोल्‍हापूर : राष्ट्रवादी आजरा कारखाना निवडणूक लढवणार; युटर्न घेतल्याने दुरंगी अथवा तिरंगी लढतीचे संकेत

कोल्‍हापूर : राष्ट्रवादी आजरा कारखाना निवडणूक लढवणार; युटर्न घेतल्याने दुरंगी अथवा तिरंगी लढतीचे संकेत

आजरा : कृष्णा सावंत आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर युटर्न घेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे निवडणूक बिनविरोधाचा मुद्दा मागे पडून दुरंगी अथवा तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांच्या बिनविरोध संदर्भाच्या बैठकीत मुश्रीफ यांनी बिनविरोधासाठी तडजोड करणे, माघार घेणे अथवा ताकदीने लढणे असे तीन पर्याय दिले होते. त्यापैकी माघारीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आमदार पाटील, आमदार कोरे यांनी मुश्रीफ यांच्या सहमतीने भाजप, कांग्रेस, उबाठा शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी आघाडीची रचना केली.

दरम्यान गुरूवारी आजरा येथील शेतकरी संघाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी दिवसभर सुधीर देसाई व मुकुंदराव देसाई यांच्यावर निवडणूक लढवण्याबबत दबाव आणला. त्यामुळे संध्याकाळी मुश्रीफ यांना भेटण्यासाठी दोन्ही देसाईंसह कार्यकर्त्ते कागलला गेले. रात्री उशिरापर्यंत मुश्रीफ यांची भेट झाली नाही म्हणून आज (शुक्रवार) सकाळी सात वाजता मुश्रीफ यांची भेट झाली.

परंतु मुश्रीफ यांनी निवडणूक लढवण्याबाबत असहमती दर्शवली. परंतु शंभरावर कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने मुश्रीफ यांचा नाईलाज झाला. अखेर निवडणूक लढवण्याबात कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य दिल्याने कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस देवदास बोलके यांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news