कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-मुंबई मार्गावर दररोज विमानसेवा सुरू होणार आहे. तशा हालचाली सुरू असून, ऑक्टोबर महिन्यापासून या मार्गावर दररोज विमानसेवा सुरू होईल, अशी शक्यता आहे.
कोल्हापूर-मुंबई मार्गावर सध्या आठवड्यातून चार दिवस सेवा सुरू आहे. ही सेवा नियमित करण्याची मागणी सातत्याने होत आहे. केवळ दैनंदिनच नव्हे, तर सकाळी आणि रात्री अशा दोन सत्रांत विमानसेवा सुरू करण्याची गरज आहे. मात्र, तांत्रिक कारणास्तव अद्याप या मागणीला यश येताना दिसत नाही. सध्या असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा दररोज सुरू करण्यासाठी हालचाली सुरू असून, ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष आठवड्यातून सातही दिवस कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा उपलब्ध होईल. तांत्रिक कारणास्तव जून महिन्यापुरती बंद करण्यात आलेली कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा दोन महिने बंदच आहे.