Kolhapur Maratha Andolan | कोल्हापूर शहरात कडकडीत बंद, ५०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात

Kolhapur Maratha Andolan | कोल्हापूर शहरात कडकडीत बंद, ५०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात

पुढारी ऑनलाईन डेस्क : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेला अमानुष लाठीमार आणि गोळीबाराच्या निषेधार्थ आज (दि. ५) कोल्हापूर शहर बंद ठेवण्यात आले आहे. या बंदला कोल्हापूरकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असून शहरातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. अनेक संघटना आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. एस.टी., केएमटी, रिक्षा, व्यापारी-व्यावसायिक आणि सर्व फेरीवाल्यांनी कडकडीत बंद पाळाला आहे. (Kolhapur city bandh)

जालना येथील लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली होती. गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजिनामा द्यावा, अशी मागणी करत सकल मराठा समाजाने आज कोल्हापूरात कडकडीत बंद पाळला आहे. दसरा चौकात मराठा समाजाकडून निदर्शने करण्यात आली आहेत. पोलिसांकडून ५०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून स्वतः पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित आंदोलनस्थळी आहेत. दरम्यान, कोल्हापूर शहर बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील महापालिका कार्यक्षेत्रातील १८५ हून अधिक प्राथमिक शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे, तसे परिपत्रक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी काढले आहे. (Kolhapur Maratha Andolan)

बंद शांततेत पार पाडावा : आमदार सतेज पाटील

"कोल्हापूर शहर बंद करण्याचा निर्णय झाला आहे. काँग्रेस पक्षाने या बंदला पाठींबा दिला आहे. कोल्हापूरांनी हा बंद शांततेने पाळावा, असे आवाहन काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.

मार्केट मध्ये नागरिकांची सकाळीच गर्दी

सकल मराठा समाजाकडून आज कोल्हापूर शहर बंदची हाक देण्यात आल्याने शहरातील सर्वच व्यवहार आज बंद आहेत. त्यामुळे सकाळी सकाळीच अनेक मार्केटमध्ये नागरिकांनी श्रावण महिन्यातील पूजेच्या खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोल्हापुरातल्या शिंगोशी मार्केटमध्ये तर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. (Kolhapur Maratha Andolan)

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news