गर्भातील कळ्यांचे सर्वाधिक मारेकरी कोल्हापुरात

गर्भातील कळ्यांचे सर्वाधिक मारेकरी कोल्हापुरात
Published on
Updated on

कोल्हापूर ः  गर्भातील मुलींचे मृत्यू रोखण्यासाठी सरकारने गर्भलिंग निदान चाचण्यांवर बंदी घातली असूनही चाचण्या सुरूच आहेत. यामध्ये राज्यातील सर्वाधिक कारवाया कोल्हापूरमध्ये झाल्या; मात्र तरीही गर्भलिंग निदान करणार्‍या टोळ्यांचे करारनामे कमी झालेले नाहीत. या टोळ्या गर्भपातही करतात.

सुस्त यंत्रणा, पारंपरिक मानसिकता आणि निष्क्रिय दक्षता समित्यांमुळे गर्भातच मुलींची हत्या करण्याचे प्रमाण वाढले. हरिओमनगर, अंबाई टँक रंकाळा, पडळ (ता. पन्हाळा), आमजाई व्हरवडे (ता भुदरगड ), मडिलगे (ता. राधानगरी ), परिते (ता. करवीर) येथील गर्भलिंग, गर्भपात निदानाची घटना ताजी असतानाच आता क्रांतिसिंह नाना पाटीलनगरातील म्हाडा कॉलनी, बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील वास्तव समोर आले. मुलींचा जन्मदर घटलेल्या जिल्ह्यांमध्ये राज्यात कोल्हापूर आघाडीवर होते. तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात केंद्रांवर कारवाया केल्या होत्या.

गर्भलिंग चाचणी केली जाऊ नये, यासाठी सायलेंट ऑब्झर्व्हर बसवण्यात आले. मुलगा हवा या पारंपरिक मानसिकतेचे भूत आजही लोकांच्या डोक्यातून जात नाही. यापुर्वी रुईकर कॉलनी, मंगळवार पेठ, टेंबलाईवाडी येथे छापे टाकण्यात आले होते. यानंतर भोगावती, पेठवडगाव, पन्हाळा, जयसिंगपूर, कूर, बिद्री, कागल अशा ठिकाणी कारवाया केल्या. बिद्री येथील डॉक्टर आणि एजंट यांनी चक्क फिरते सोनोग्राफी सेंटर सुरू केले होते.

5 वर्षांतील कारवाया

2020 कोडोली (ता. पन्हाळा ), 2021 इचलकरंजी, परिते (ता. करवीर), 2022 – पडळ (ता. पन्हळा ), 2023 – आमजाई व्हरवडे, कसबा वाळवे (ता. राधानगरी ), मडिलगे (ता. भुदरगड), कोल्हापूर शहर, 2024 – क्रांतिसिंह नाना पाटीलनगर म्हाडा कॉलनी, बांबवडे.
दरम्यान, गर्भलिंग निदानप्रकरणी शिक्षा होण्याची राज्यातील पहिली घटना बिद्री (ता. कागल) येथील होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news