कोल्हापूर : कोल्हापूर शहर बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील महापालिका कार्यक्षेत्रातील 185 हून अधिक प्राथमिक शाळांना मंगळवारी (दि. 5) सुट्टी राहणार आहे, तसे परिपत्रक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी मुख्याध्यापकांना काढले आहे.
जालना येथील लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा संघटनांनी मंगळवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक व्यवस्था बंद राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थी हिताचा विचार करून शहरातील सर्व प्राथमिक शाळांना सट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षक दिनानिमित्त घेण्यात येणारे विविध कार्यक्रम व रक्तदान शिबिरे रद्द करण्यात आली आहे.
माध्यमिक शाळा सुरू राहणार
शहरातील माध्यमिक शाळा मात्र सुरू राहणार आहेत. माध्यमिक शिक्षण संचालक व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शाळा बंद ठेवण्याचे आदेश नसल्याने सर्व माध्यमिक शाळा सुरू राहतील, असे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सांगितले.