काेल्हापूर : मोहरेत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक गंभीर

काेल्हापूर : मोहरेत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक गंभीर
Published on
Updated on

मोहरे ; पुढारी वृत्तसेवा : येथील विद्यामंदिर शाळेसमोरील गेटजवळ खेळणार्‍या पाच वर्षांचे बालक शंभो आप्पासो आभ्रे (रा. मोहरे, ता. पन्हाळा) याच्यावर भटक्या कुत्र्याने जीवघेणा हल्‍ला केला. चेहर्‍याचे लचके तोडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्हा परिषद शाळेसमोरील गेटजवळ शंभो खेळत होता. अचानक मोकाट कुत्र्याने त्याच्यावर हल्‍ला केला. हा प्रकार शाळेजवळील विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी शंभूच्या घरी माहिती दिली. नातेवाईक धावत आले आणि त्यांनी मोकाट कुत्र्याला हुसकावून बालकाची सुटका केली. मनसे जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेळके व राम नलवडे यांनी कोडोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news