kolhapur airport : नाईट लँडिंगचा पहिला टप्पा पार

kolhapur airport : नाईट लँडिंगचा पहिला टप्पा पार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर विमानतळ ( kolhapur airport ) वरील नाईट लँडिंगचा पहिला टप्पा मंगळवारी पार पाडला. कोल्हापूर विमानतळाला 'आयएफआर' परवाना मिळाला आहे. यामुळे कमी द़ृश्यमानता असतानाही विमानाचे लँडिंग आणि टेकऑफ करता येणार आहे. परिणामी कमी द़ृश्यमानतेमुळे ऐनवेळी विमानाचे लँडिंग अथवा टेकऑफ रद्द करावे लागत होते. असे प्रकार यापुढे होणार नाहीत.

कोल्हापूर विमानतळाकडे ( kolhapur airport ) '3 सी व्हीआरएफ' परवाना होता. त्याची मुदत आज (दि. 14 डिसेंबर) पर्यंत होती. हा परवाना नूतनीकरण करतानाच तो अपग्रेड करण्यासाठीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कोल्हापूर विमानतळाचा '3 सी व्हीआरएफ डे लाईट' हा परवाना अपग्रेड करून तो आता '3 सी आयएफआर' परवाना देण्यात आला.

कोल्हापूर विमानतळाला ( kolhapur airport ) '3 सी आयएफआर' परवाना मिळाल्याने नाईट लँडिंगच्या मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे. या परवान्यानुसार विमानतळावर होणार्‍या 'ऑपरेशन' (विमानांची ये-जा) वर लक्ष ठेवण्यात येणार आहे. कमी द़ृश्यमानता असतानाही विमानाचे लँडिंग आणि टेकऑफ होताना सुरक्षिततेच्या द़ृष्टीने कोणत्या अडचणी येतात का, याची पाहणी केली जाणार आहे. यामध्ये कोणत्या अडचणी आल्या तर त्या दूर केल्या जातील, जर अडचणी आल्या नाही तर नाईट लँडिंगची पुढील प्रक्रिया आणखी वेगाने पार पडणार आहे.

काय आहे '3 सी आयएफआर डे लाईट' परवाना ( kolhapur airport )

कोल्हापूर विमानतळाकडे यापूर्वी '3 सी व्हीएफआर डे लाईट' परवाना अर्थात 'व्हिज्युअल फ्लाईटस् रूल्स' म्हणजेच डोळ्यांनी दिसणारी द़ृश्यमानता. या परवान्यानुसार 5 हजार मीटरपेक्षा अधिक द़ृश्यमानता (व्हिजिबिलिटी) असेल तरच विमानाचे लँडिंग अथवा टेकऑफ केले जाते. '3 सी आयएफआर डे लाईट' परवाना म्हणजे 'इन्स्ट्रुमेंशन फ्लाईट रुल्स' म्हणजेच यंत्रांच्या सहाय्याने दिसणारी दृश्यमानता. यामुळे 3 हजार मीटरपेक्षा अधिक दृश्यमानता असतानाही विमानाचे लँडिंग अथवा टेकऑफ केले जाते.

या परवान्यामुळे काय होणार ( kolhapur airport )

कोल्हापूर विमानतळावर कमी दृश्यमानतेमुळे सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा विमानाचे लँडिंग अथवा टेकऑफ होत नव्हते. आता हा नवा परवाना मिळाल्यामुळे सकाळी लवकर तसेच सायंकाळी सूर्यास्तानंतरही काही काळ विमानाचे लँडिंग अथवा टेकऑफ करता येणार आहे. यापूर्वी सूर्यास्तानंतरही काही काळ प्रकाश (उजेड) राहतो, त्यावेळी लँडिंग अथवा टेकऑफ करता येत नव्हते. आता त्याची चिंता राहणार नाही. कोल्हापूर विमानतळावरील दृश्यमानता सकाळी लवकर तसेच सांयकाळी उशिरापर्यंत 3000 मीटर पेक्षा खाली जात नाही.

कोल्हापूरला काय फायदा होणार ( kolhapur airport )

कोल्हापूर विमानतळावर येणार्‍या फ्लाईटला विलंब झाला की अनेकदा त्या रद्द करण्याची वेळ येत होती. सायंकाळी लँडिंग होऊन पुन्हा टेकऑफ करेपर्यंत आवश्यक दृश्यमानता नसल्याचे कारण दिले जात होते. यामुळे दोन वेळा टेकऑफसाठी रनवेवर गेलेल्या फ्लाईट रात्रभर विमानतळावर थांबून ठेवाव्या लागल्या. अनेकदा पाऊस आणि धुक्यामुळे फ्लाईट रद्द झाल्या. तर दृश्यमानता नसल्याने अनेकदा फ्लाईट उशिरा येतात. याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. असे सर्व प्रकार आता बंद होणार आहे.

नाईट लँडिंगसाठी प्रयत्नशील

कोल्हापूर विमानतळाचा विकास सुरू आहे. तो अधिक वेगवान व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विमानतळाच्या नाईट लँडिंगच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामुळे लवकरच नाईट लँडिंग करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासह विमानतळावरील अन्य विकासकामे तसेच विविध मार्गावरील फ्लाईट, कार्गो सेवा, फ्लाईंग क्लब आदीसाठीही पाठपुरावा सुरू आहे.
– सतेज पाटील, पालकमंत्री

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news