आता ‘मेटा’ करणार ‘ट्विटर’सारखा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म लॉन्च, कोड नेम झाले लीक

आता ‘मेटा’ करणार ‘ट्विटर’सारखा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म लॉन्च, कोड नेम झाले लीक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: फेसबुकची मूळ (पॅरेंट) कंपनी मेटा आता टेक्स्ट शेअरिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. एका रिपोर्टनुसार, मेटा आता जगातील सर्वात मोठ्या 'ट्विटर' या मायक्रोब्लॉगिंग साइटशी स्पर्धा करण्याची तयारी करत आहे. इलॉन मस्क ट्विटरचे मालक झाल्यानंतर अनेक जाहिरातदारांनी ट्विटरकडे पाठ फिरवली आहे, ज्याचा फायदा घेण्यासाठी मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग आता तयार आहे.

मेटाच्या ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्मची बातमी प्रथम प्लॅटफॉर्मर आणि मनीकंट्रोल या न्यूज साइट्सनी नोंदवली होती. मेटाने एका ई-मेलमध्ये पुष्टी केली आहे की, ते नवीन टेक्स्ट बेस्ड अॅपवर काम करत आहेत. क्रिएटर्सला नवीन व्यासपीठ देण्याचा प्रयत्न असल्याचे मटाने सांगितले आहे. मेटाच्या ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्मला P92 असे सांकेतिक नाव दिले जात आहे.

मेटाच्या अपकमिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची स्पर्धा Mastodon, Koo आणि Twitter अॅप्सबरोबर होणार आहे. आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, Mastodon हे डी-सेंट्रलाइज्ड सर्व्हरद्वारे काम करते, म्हणजेच त्यासाठी कोणतेही केंद्रीय व्यवस्थापन किंवा प्राधिकरण नाही. मेटाचे नवीन प्लॅटफॉर्म आणि ट्विटर यांच्यात तीव्र स्पर्धा होणार आहे, कारण एलन मस्कने फेसबुक, इंस्टाग्राम आणि Mastodonच्या लिंक्स ट्विटरवर शेअर कारण्यासं अंशतः बंदी घातली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news