Virat Kohli : विराटपेक्षा क्लासेनचे शतक ‘क्लासिक’ : पीटरसन

Virat Kohli : विराटपेक्षा क्लासेनचे शतक ‘क्लासिक’ : पीटरसन

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्यात हेन्रीच क्लासेन आणि विराट कोहलीचे अशी दोन शतके झाली. दोघांनीही झुंजार शतकी खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, विराटचा हा प्रयत्न यशस्वी ठरला तर क्लासेनचे 51 चेंडूंत ठोकलेल्या 104 धावा वाया गेल्या. सामना झाल्यानंतर या दोन्ही शतकवीरांपैकी कोणत्या शतकवीराचे शतक भारी होते, अशी चर्चा सुरू झाली. यावेळी इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने विराट कोहलीच्या शतकापेक्षा क्लासेनचे शतक जास्त भारी होते, असे मत व्यक्त केले. (Virat Kohli)

स्टार स्पोर्टस्वर बोलताना केविन पीटरसन म्हणाला की, 'या दोघांपौकी हेन्रीच क्लासेनचे शतक चांगले होते. विराटपेक्षा क्लासेनची इनिंग चांगली होती. तुम्ही विचार करा की जो संघ आधीच बाहेर पडला आहे. त्या संघाचा भाग असणे आणि संघातील इतर खेळाडूंकडून फारशी साथ न लाभणे. जो संघ फारसा क्रियाशील नाही, अशा संघासाठी कामगिरी करणे हे कौतुकास पात्र असते. क्लासेन ज्या प्रकारे खेळला ते जबरदस्त होते.' (Virat Kohli)

हेही वाचा; 

logo
Pudhari News
pudhari.news