Rahul Dravid Statement : द्रविड गुरुजींची मोठी घोषणा, केएल राहुलची ‘या’ जबाबदारीतून मुक्तता

Rahul Dravid Statement : द्रविड गुरुजींची मोठी घोषणा, केएल राहुलची ‘या’ जबाबदारीतून मुक्तता
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rahul Dravid Statement : केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विकेटकीपिंग करणार नसून तो एक फलंदाज म्हणून खेळेल. त्यामुळे या मालिकेत यष्टीरक्षक म्हणून केएस भरत आणि ध्रुव जुरेल यापैकी एकाला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवले जाईल, असा खुलासा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मंगळवारी (दि. 23) केला.

द्रविड म्हणाले, 'केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत यष्टीरक्षक म्हणून खेळणार नाही. आमच्याकडे केएस भरत आणि ध्रुव जुरेल यांचा पर्याय आहे. राहुलने द. आफ्रिकेत यष्टिरक्षक म्हणून चांगली कामगिरी केली. मालिका बरोबरीत राखण्यात त्याने एक फलंदाज म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली. पण गुरुवारपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होत असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे राहुलला आम्ही मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून पाहत आहे. संघाकडे यष्टीरक्षक म्हणून दोन पर्याय आहेत. त्यातून एकाची निवड केली जाईल.'

भारतीय खेळपट्ट्यां लक्षात घेता फिरकी गोलंदाजीवर यष्टीरक्षण करणे सोपे नसते. विशेषत: रविंद्र जडे आणि आर अश्विन यासारख्या फिरकीपटूंचे चकवणारे चेंडू विकेटच्या मागे पकडणे पूर्णवेळ यष्टीरक्षण करणा-याला देखील आव्हानात्मक असते. केएल राहुलने अलीकडेच द. आफ्रिका दौऱ्यात दोन सामन्यांच्या मालिकेत यष्टिरक्षकाची भूमिका बजावली होती. त्यात त्याने यष्टीमागे चमकदार कामगिरी केली. पण दुसरीकडे तो 92 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये केवळ तीन वेळा एक विशेषज्ञ यष्टीरक्षक म्हणून खेळला आहे आणि यापैकी एकही सामना तो भारतात खेळलेला नाही. (Rahul Dravid Statement)

राहुलच्या तुलनेत केएस भरतने आतापर्यंत यष्टीमागे चांगली कामगिरी केली आहे. मात्र, तो फलंदाजीत छाप पाडण्यात अद्याप यशस्वी झालेला नाही. भरतने भारतात 92 पैकी 82 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि या कालावधीत त्याने 287 झेल आणि 33 स्टंपिंग केले आहेत. त्यामुळे अनुभवाच्या जोरावर जुरेलपेक्षा भरतला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात भारत अ संघाकडून खेळताना भरतने इंग्लंड लायन्सविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. त्याने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत विकेटच्या मागे चांगले प्रदर्शन केले होते. (Rahul Dravid Statement)

मंगळवारी दुपारी सराव सत्रादरम्यान भरतने नेटमध्ये अश्विन आणि जडेजाच्या चेंडूंवर सराव केला. यावेळी रोहित शर्माही उपस्थित होता आणि सराव सत्रादरम्यान त्याला मदत करताना दिसला. जुरेलने राहुल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासोबत झेल पकडण्याचा सरावही केला.

हैदराबादची खेळपट्टी वळणदार? (Rahul Dravid Statement)

हैदराबादची खेळपट्टी वळणदार असण्याची शक्यता जास्त आहे. सामन्याच्या दोन दिवस आधी, खेळपट्टीचा दोन्ही टोकांकडीक गुड लेन्थचा भाग इतर भागांपेक्षा कोरडा दिसत होता. दरम्यान, या खेळपट्टीवर प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, 'खेळपट्टी विषयी आताच काही बोलणे अवघड आहे. खरेतर मला खेळपट्टी आवडली. माझ्या निरीक्षणानुसार चेंडूला वळण मिळू शकते, पण सामन्याच्या कोणत्या टप्प्यात हे चेंडू फिरायला सुरुवात होईल आणि किती वेगाने तो फिरेल हे सांगणे थोडे कठीण आहे. पण जसजसा खेळ पुढे जाईल तसतशी खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करेल हे निश्चित आहे.'

इंग्लंडचे संघाचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि कर्णधार बेन स्टोक्स अशा संघासोबत येत आहेत ज्यांनी मागील 19 पैकी 13 कसोटी जिंकल्या आहेत. त्यांची बॅझबॉल ही रणनिती त्यांना भारतात कितपत उपयुक्त ठरेल याबाबत याबाबत बरीच उत्सुकता दिसून येत आहे.

द्रविड म्हणाले, 'इंग्लंडचा संघ खूप चांगले क्रिकेट खेळला आहे आणि त्यांना त्यांच्या बॅझबॉल रणनितीचा फायदाही झाला आहे. पण भारतीय खेळपट्ट्या इंग्लिश संघासाठी आव्हानात्मक असतील. आमच्यावर देखील दबाव असेल. पण एक प्रशिक्षक या नात्याने मी आमच्या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करतो, ते नक्कीच चांगला खेळ करून विजय मिळतील असा मला विश्वास आहे.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news