‘इथे सगळेच माझी खूप काळजी घेतात बाबा’ दिवंगत गायक  के के ची लेक कॉन्सर्ट दरम्यान झाली भावूक  

‘इथे सगळेच माझी खूप काळजी घेतात बाबा’ दिवंगत गायक  के के ची लेक कॉन्सर्ट दरम्यान झाली भावूक  

पुढारी ऑनलाईन डेस्क : अत्यंत  सुरेख आवाजाची देणगी लाभलेले गुणी गायक केके यांचं अलीकडेच दु:खद निधन झालं. केके या नावाने प्रसिद्ध असलेल्या कृष्णकुमार कुन्नथ यांचे चाहते जगभर आहेत. मे मध्ये हार्ट अटॅकने के के यांचा मृत्यू झाला.

केके च्या आकस्मिक जाण्याने फॅन्स आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. केकेची लेक तमारा हिने मात्र वडिलांना आगळया पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तमाराने पहिल्यांदाच लाईव्ह कॉन्सर्ट केलं आहे. गायक शानसोबत तमाराने पहिलं कॉन्सर्ट केलं आहे. सोशल मीडियावर तमाराने हे फोटो शेअर केले आहेत. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तमारा म्हणते 'हा पहिलाच अनुभव खूप स्पेशल होता.

शान अंकल यांचे खूप आभार ज्यांनी मला its time to disco या गाण्यात सोबत केली. बाबा कुठे असतील तिथून त्यांच्या चेहर्‍यावर हसू आलं असेल. हे घडत असताना बाबा पाहिजे होते असं राहून राहून वाटत होतं. या फोटोंमध्ये शान, पॅपॉन, बेनी दयाळ, अरमान मालिक हे देखील दिसत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news