किशोर ग्रँडमास्टर डी. गोकेशने विश्वनाथन आनंदला टाकले मागे

किशोर ग्रँडमास्टर डी. गोकेशने विश्वनाथन आनंदला टाकले मागे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : किशोर ग्रँडमास्टर डी. गोकेशने गुरुवारी बुद्धिबळ वर्ल्डकपच्या दुसर्‍या फेरीत अजरबैजानच्या मिसरातदिन इस्कांद्रोवला पराभवाचा धक्का दिला. याबरोबरच गोकेशने फिडेच्या लाईव्ह वर्ल्ड रेटिंगमध्ये आपला आदर्श विश्वनाथन आनंदला देखील मागे टाकले. आता तो वर्ल्ड रँकिंगच्या 9 व्या स्थानावर पोहोचला आहे. विश्वनाथन आनंद 10 व्या स्थानावर आहे. अवघ्या 17 वर्षांच्या गुकेशने दुसर्‍या फेरीत दुसर्‍या डावातच अजरबैजानच्या इस्कांद्रोवला 44 चालीत चेकमेट केले.

फिडेने आपल्या अधिकृत निवेदनात सांगितले की, डी गोकेशने आज पुन्हा एकदा विजय मिळवला आणि रेटिंगमध्ये विश्वनाथन आनंदच्या पुढे निघून गेला. 1 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार्‍या फिडे रेटिंगला अजून एक महिना अवकाश आहे. मात्र, 17 वर्षांचा गोकेश हा सर्वाधिक रेटिंग असलेला खेळाडू होण्याची दाट शक्यता आहे. तो वर्ल्ड रँकिंगमध्ये पहिल्या 10 मध्ये जागा निश्चित करेल.

2016 मध्ये हरिकृष्णन गेला होता

विश्वनाथन आनंदला बुद्धिबळ फिडे रँकिंगमध्ये एका भारतीयने मागे टाकण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2016 मध्ये हरिकृष्णनने आनंदला मागे टाकले होते. मात्र, त्याला आपले रँकिंग फार काळ वर ठेवता आले नाही. गोकेशला 2.5 रेटिंग पॉईंटस्चा फायदा झाला आहे. त्याचे लाईव्ह रेटिंग हे 2755.9 इतके आहे. जर आनंदचे रेटिंग हे 2754.0 इतके आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news