Kisan Mahapanchayat: MSP सह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांची दिल्लीतील रामलीला मैदानात ‘महापंचायत’, दिल्ली पोलीस अलर्ट

Kisan Mahapanchayat
Kisan Mahapanchayat
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या एमएसपीसह अनेक मागण्यांसाठी आज (दि.१४) दिल्लीतील रामलीला मैदानावर शेतकऱ्यांनी महापंचायत भरवली आहे. दरम्यान मैदानात मोठ्या प्रमाणात महिला देखील उपस्थित आहेत. महापंचायत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनाक केली असून, पोलिस अलर्ट मोडवर आहेत. (Kisan Mahapanchayat)

Kisan Mahapanchayat: दिल्ली पोलिस अलर्ट मोडवर

सुरक्षा व्यवस्थेबद्दल, डीसीपी सेंट्रल एम हर्ष वर्धन म्हणाले, 'कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही विस्तृत व्यवस्था केली आहे. आयोजक गटाने लेखी आश्वासन देखील दिले आहे ज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याशी संबंधित विविध मुद्दे आहेत. आम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखू. कायदा आणि सुव्यवस्थेचा गडबड न होता सुरक्षितरित्या आंदोलन व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे देखील दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Kisan Mahapanchayat)

दानकौरमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखले

दिल्लीच्या रामलीला मैदानावर आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या शेतकरी नेत्यांना ग्रेटर नोएडातील दनकौरमध्ये पोलिसांनी रोखले आहे. (Kisan Mahapanchayat)

दिल्ली पोलिसांकडून वाहतूक अॅडव्हायजरी जारी

दिल्ली वाहतूक पोलिसांनी ट्रॅफिक ॲडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, किसान महापंचायत गुरूवार 14 मार्च 2024 रोजी रामलीला मैदान, जवाहरलाल नेहरू मार्ग येथे होणार आहे. जवाहरलाल नेहरू मार्गावर असलेल्या रामलीला मैदानावर शेतकऱ्यांची महापंचायत पाहता अनेक मार्गांवर जाम होण्याची शक्यता असून, वाहतुकीचे अनेक मार्ग वळवण्यात आले आहेत. या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news