Kim Jong-un : ‘…तर तुमच्या मुलीचे नाव बदला’, किम जोंग उन यांचा अजब फतवा

Kim Jong Un
Kim Jong Un

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन (Kim Jong-un ) नेहमी चर्चेत असणार व्यक्तिमत्व. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या एका अजब आदेशाने चर्चेत आले आहेत. त्यांचा हा आदेश पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.  हा आदेश त्यांच्या मुलीशी संबधित आहे. त्यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे की," ज्यांनी आपल्या मुलीचे नाव माझ्या (किम जोंग उन)  मुलीच्या नावावरून ठेवले आहे त्यांनी ते बदलून दुसरे काहीतरी ठेवावे"

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन (Kim Jong-un) यांच्या आदेशाची चर्चा जगभर होत आहे. त्यांचा हा आदेश आपल्या १०  वर्षीय मुलीच्या नावासंबंधित आहे. तिचं नाव जू ए (Ju Ae) असं आहे. किम जोंग-उन यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे की, जू ए (Ju Ae) हे नाव असेल तर बदलून घ्या आणि तिच्या नावासारखं नाव ठेवायचं नाही आहे. आदेश देत त्यांनी  "जु-ए" हे नाव बदलण्यास भाग पाडलं आहे.

जू-एईभोवती गूढ निर्माण करण्याचा प्रयत्न

जू-एई ही किम जोंग-उन यांची दुसरी मुलगी आहे. मध्यंतरी तिच्या नावाची चर्चा किम जोंग-उन नंतर उत्तराधिकारी म्हणून होत होती.  साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानूसार, जू-एई नाव न ठेवण्याचा  हा आदेश किम जू-ए भोवती वलय निर्माण करण्याचा सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. अधिकाऱ्यांकडून नागरिकांना सांगण्यात येत आहे की, 'जू-एई' हे नाव आता "सर्वोच्च प्रतिष्ठित" व्यक्तींसाठी राखीव ठेवले गेले आहे.

Kim Jong Un:  तात्काळ नाव बदला

तर रेडिओ फ्री एशियाला सुत्रांनी सांगितलं की, उत्तर प्रांतातील एका सुरक्षा अधिकाऱ्याने "जू-ई नावाने नोंदणी विभागात नोंदणीकृत महिलांना त्यांची नावे बदलण्यासाठी सुरक्षा मंत्रालयाकडे बोलावले आहे. या संदर्भात बोलत असताना एका महिलेने सांगितले की, आपल्या १२ वर्षीय मुलीच नाव बदलण्यासाठी सुरक्षा मंत्रालयाच्या निवासी नोंदणी विभागाने  पालकांना सुरक्षा मंत्रालयात बोलावले गेले आणि त्यांची नावे बदलण्यास आणि त्यांचे जन्म प्रमाणपत्र बदलण्यास भाग पाडले गेले आहे. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानूसार, "प्योंगयांग शहर सुरक्षा विभागाने  'जु-ए' नाव वापरून महिलांची नावे एका आठवड्याच्या आत बदलण्याचा अंतर्गत आदेश जारी केला आहे."

यापूर्वीही असे आदेश

किम जोंग-उन यांनीच फक्त असा निर्णय घेतलेला नाही. यापूर्वीही असे निर्णय घेण्यात आले आहेत. साउथ चायना मॉर्निंग यांच्या वृत्तानूसार, ही प्रथा  किम इल-सुंग यांच्या काळातील आहे. त्यांच्या काळात  लोकांना समान नाव ठेवण्यास बंदी होती. त्याचबरोबर, किम जोंग-इलच्या राजवटीतही (२०१४) त्याच नावाच्या लोकांना देखील ते बदलण्यास भाग पाडले गेले होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news