Kiara Advani : कियाराने पहिल्यांदाच दाखविला आईचा फोटो

Kiara Advani : कियाराने पहिल्यांदाच दाखविला आईचा फोटो
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ७  फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात आणि मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह संपन्न झाला. या कपलचा शाही विवाह राजस्थानच्या जैसलमेरमधील सूर्यगढ किल्ल्यात पार पडला. या विवाहाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यादरम्यान कियाराची (Kiara Advani )  आई जेनेवीव आडवाणीसोबतची ( Genevieve Advani ) क्यूट झलक पाहायला मिळाली आहे.

अभिनेत्री कियारा आडवाणीने (Kiara Advani ) लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटो कियारासोबत तिचा भाऊ आणि आई जेनेवीव आडवाणी दिसत आहे. पहिल्यांदाच कियाराच्या आईला पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. यावेळी कियारा पिंक – व्हाईट कलरचा लेहंग्यात ग्लॅमरस दिसतेय. तर आई जेनेवीव व्हाईट कलरच्या लेंहग्यात सुंदर दिसतेय.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'Mummaaaaaa❤️, माझ्या प्रेमळ, काळजी घेणार्‍या, प्रार्थना करणार्‍या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. तुझी मुलगी होण्यात मी धन्य आहे❤️'. असे लिहिले आहे. यावरून कियाराच्या आईचा आज वाढदिवस असून या निमित्ताने खास फोटो शेअर केल्याचे स्पष्ट होत आहे. यावेळी जेनेवीवने हेवी ज्वेलरी, केसांची स्टाईल, लिपस्टिक, मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी शुभेच्छा देत भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'कियाराची मोठी बहिणी दिसते' असते म्हटलं आहे. तर दुसऱ्या युजर्सने 'Beautiful ❤️', 'Happy birthday aunty?❤️❤️', 'Bhut hi pyari photo hai. Wish you a very happy birthday to you Dear mother ??', 'Abhi to ammi bhi jawan he ?', 'Your mom is more beautiful than you Mam?❤️', 'Like mother like daughter ❤️?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यंत ४० लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आगामी 'योधा' चित्रपटात दिसणार आहे. यात तो एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत असून हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर कियाराने अलीकडेच आगामी 'सत्यप्रेम' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news