![Kia Carens : किया कारची ग्राहकांसाठी विशेष मोहीम; आपल्या वाहनात दोष असेल तर…](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F10%2Fkia-carens-car.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : किया कंपनीने (Kia) मंगळवारी कारच्या एअरबॅग कंट्रोल मॉड्यूल सॉफ्टवेअरमधील दोषाची तपासणी करण्यासाठी Carens कारसाठी रिकॉल मोहीम जाहीर केली. या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये लाँच झालेल्या, Kia Carens ची किंमत 9.60 लाख ते 17.70 लाख रुपये (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) दरम्यान आहे.
कंपनीकडून या मोहिमेसाठी किती केरेन्सच्या कार परत मागविण्यात आल्या आहेत याच्याबाबत अद्याप सांगण्यात आले नाही. मात्र या रिकॉल मोहिमेसाठी केरेन्स कारच्या सर्व कार मालकांशी संपर्क साधणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. (Kia Carens)
ज्या ग्राहकांच्या कारमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कियाच्या अधिकारी, कर्मचारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. किया ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत वेबसाईट किंवा अॅपवर याबाबत माहिती मिळेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
"किया केरेन्समधील एअरबॅग कंट्रोल मॉड्यूल सॉफ्टवेअरमधील संभाव्य त्रुटीची तपासणी करण्यासाठी Kia द्वारे ही ऐच्छिक रिकॉल मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी कंपनी काळजी घेईल," असे कंपनीने म्हटले आहे. Kia आवश्यक असल्यास सॉफ्टवेअर अपडेट मोफत देखील देईल.
हेही वाचा