Khalistan supporters attacked Indian student : ऑस्ट्रेलियात खलिस्तान समर्थकांकडून भारतीय विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला

Khalistan supporters attacked Indian student : ऑस्ट्रेलियात खलिस्तान समर्थकांकडून भारतीय विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियात एका भारतीय विद्यार्थ्यावर खलिस्तान समर्थकांकडून लोखंडी रॉडच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. खलिस्तान समर्थकांच्या अतिरेकी कारवायांविरोधात आवाज उठवल्याने हा हल्ला करण्यात आला, असल्याचे वृत्त 'ऑस्ट्रेलिया टुडे'ने दिली आहे. सिडनीच्या मेरीलँड्सच्या पश्चिम उपनगरात विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला. याच ठिकाणी हल्लेखोरांनी "खलिस्तान जिंदाबाद" चे नारे दिले होते. (Khalistan supporters attacked Indian student)

चालक म्हणून काम करणाऱ्या एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती देताना सांगितले की, "आज सकाळी ५.३० वाजता मी कामावर जात असताना, काही ४-५ खलिस्तान समर्थकांनी माझ्यावर हल्ला केला." त्याने पुढे स्पष्ट केले की, तो त्याच्या वाहनात जात असताना हल्लेखोर अचानक समोर आले. त्यांनी डाव्या बाजूचा दरवाजा उघडला आणि त्याच्या डाव्या डोळ्याच्या खाली त्याच्या गालाच्या हाडावर लोखंडी रॉडने वार केले. (Khalistan supporters attacked Indian student)

यानंतर हल्लेखोरांनी विद्यार्थ्याला वाहनाबाहेर ओढून लोखंडी रॉडने मारहाण केली. शिवाय दोन हल्लेखोरांनी या मारहाणीचा व्हिडिओ देखील शूट केला आहे. त्याच्यावर प्राणघातक हल्ला करताना हल्लेखोरांनी सतत 'खलिस्तान झिंदाबाद' असा नारा दिला. जानेवारीमध्ये तथाकथित "पंजाब स्वातंत्र्य सार्वमत" दरम्यान मेलबर्नमध्ये खलिस्तानी कार्यकर्ते आणि भारत समर्थक निदर्शक यांच्यात झालेल्या चकमकीनंतर ही घटना घडली आहे. (Khalistan supporters attacked Indian student)

हेही वाचंलत का?

logo
Pudhari News
pudhari.news