पुणे: महानंद डेअरीच्या संचालकपदी केशरताई पवार

पुणे: महानंद डेअरीच्या संचालकपदी केशरताई पवार

शिक्रापूर, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) संचालकपदी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षा केशरताई सदाशिव पवार यांची बिनविरोध निवड झाली. सहकार क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या महानंद संचालकपदी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातुन त्यांना ही संधी मिळाली आहे. केशरताई पवार या पुणे जिल्हा दुध संघावर सुमारे १८ वर्ष संचालक असून कात्रज दुध संघाच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला म्हणून विराजमान होण्याची संधी देखील त्यांना मिळाली. जेष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी टाकलेला विश्वासास आपण नक्की पात्र राहू. महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी तसेच दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला चांगला भाव मिळावा, यासाठी या पदाच्या माध्यमातून काम करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. पवार यांची निवड झाल्याबद्दल कात्रज दुध संघाच्या संचालक मंडळाचे वतीने तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news