Akka Series : किर्ती सुरेशला भिडणार राधिका आपटे; जबरदस्त थ्रिलर सीरीज

Akka Series
Akka Series
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : यशराज फिल्म्सची स्ट्रीमिंग निर्मिती YRF एंटरटेनमेंट 'अक्का' सीरीज ( Akka Series )  घेवून आली आहे. ही सीरीज भारतातील दोन सर्वात प्रशंसित महिला कलाकारांना एकमेकांच्या विरोधात भिडणारा एक उत्कृष्ट रिव्हेंज थ्रिलर आहे. या सुपर पिरियड थ्रिलरमध्ये किर्ती सुरेशला राधिका आपटे भिडणार आहे.

संबंधित बातम्या 

या सीरीजचे दिग्दर्शन नवोदित लेखक आणि दिग्दर्शक धर्मराज शेट्टी करत आहेत. 'अक्का' बद्दलच्या त्याच्या दृष्टीने आदित्यचं लक्ष वेधून घेतलं आणि YRF एंटरटेनमेंटच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या टेंटपोल सीरीजपैकी अक्काला बनवण्यासाठी आदित्यने सुरूवात केली आहे.

YRF एंटरटेनमेंटची पहिली मालिका 'द रेल्वे मॅन' ही सध्या जागतिक यशोगाथा आहे. कारण ती Netflix वर जगभरातील टॉप 10 शोमध्ये ट्रेंड करत आहे. आर. माधवन, के के मेनन, दिव्येंदु शर्मा आणि बाबिल खान यांनी अभिनय केलेल्या १९८४ च्या भोपाळ वायू दुर्घटनेतील समोर न आलेल्या नायकांना ही श्रद्धांजली आहे.

YRF एंटरटेनमेंटची दुसरी सीरीज 'मंडला मर्डर्स' आहे, ही एक बहु-सीझन मालिका आहे. जी एक भयंकर गुन्हेगारी थ्रिलर आहे. चंदिगड करे आशिकी चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारून समीक्षकांची प्रशंसा मिळवणारी वाणी कपूर, वैभव राज गुप्ता (गुलक फेम) सोबत, स्ट्रीमिंग स्पेसमध्ये पदार्पण मालिकेचे नेतृत्व करत आहे. सुरवीन चावला (डीकपल्ड) आणि जमील खान (गुलक) प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेची निर्मिती सध्या सुरू आहे. ( Akka Series )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news