“…तर काश्‍मीरचे नशीब गाझासारखेच असेल” : फारुख अब्दुल्लांची धक्‍कादायक टिप्‍पणी

नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्‍मू-काश्‍मीरचे माजी मुख्‍यमंत्री फारुख अब्दुल्ला. (संग्रहित छायाचित्र)
नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्‍मू-काश्‍मीरचे माजी मुख्‍यमंत्री फारुख अब्दुल्ला. (संग्रहित छायाचित्र)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि पाकिस्तानने चर्चेद्वारे वाद संपवले नाहीत, तर गाझा आणि पॅलेस्टाईनसारखेच काश्मीरचे नशीब हे गाझा शहरासारखेच असेल, अशी धक्‍कादायक टिप्‍पणी नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्‍मू-काश्‍मीरचे माजी मुख्‍यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी केली आहे. पूंछमध्ये दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे ५ जवान शहीद झाले. यानंतर दुसऱ्या दिवशी तीन नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर त्‍यांनी केलेले धक्‍कादायक विधान चर्चेचा विषय ठरले आहे.

Farooq Abdullah : आम्ही चर्चा करण्यास का तयार नाही?

आज (दि.२६) माध्‍यमांशी बोलताना फारुख अब्दुल्ला म्‍हणाले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चेतून तोडगा निघाला नाही, तर गाझा आणि पॅलेस्टाईनवर इस्त्रायलकडून बॉम्बफेक होत असल्यासारखेच नशीब आपल्याला भोगावे लागेल. नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होणार आहेत. ते भारताशी चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगत आहेत; पण आम्ही चर्चा करण्यास का तयार नाही? जर तोडगा निघाला नाही तर काश्‍मीरचे नशीब गाझा आणि पॅलेस्टाईनसारखेच होईल."

आता युद्ध हा पर्याय नाही

दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काश्मीरबाबतच्या भूमिकेचा दाखला देत अब्दुल्ला म्हणाले, "अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की आपण आपले मित्र बदलू शकतो; पण शेजारी नाही. आपण आपल्या शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण राहिलो तर दोघांचीही प्रगती होईल. आता युद्ध हा पर्याय नाही आणि हे प्रश्न चर्चेने सोडवले पाहिजेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्‍पष्‍ट केले आहे."

लष्‍करप्रमुखांनी दिली राजौरी आणि पूंछ जिल्‍ह्यांना भेट

लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांना भेट दिली आणि स्थानिक सैनिकांना दहशतवाद्यांकडून लपण्याचे ठिकाण म्हणून वापरल्या जाणार्‍या गुहा उद्ध्वस्त करण्यास सांगितले. परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला.


हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news