Karnataka Politics | काँग्रेस सरकारच्या अस्थिरतेचा कट, काहीजण सिंगापूरला…! डीके शिवकुमारांच्या दाव्याने खळबळ

Karnataka Politics | काँग्रेस सरकारच्या अस्थिरतेचा कट, काहीजण सिंगापूरला…! डीके शिवकुमारांच्या दाव्याने खळबळ
Published on
Updated on

बंगळूर, पुढारी ऑनलाईन : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (Karnataka Deputy CM DK Shivakumar) यांनी बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपातून काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. परदेशात राहून काही लोक नव्याने सत्तेत आलेल्या कर्नाटकातील काँग्रेस सरकारविरोधात कट रचत आहेत. कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाडण्याची योजना आखण्यासाठी सिंगापूरला गेलेल्या लोकांची माहिती आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (Karnataka Politics)

शिवकुमार यांनी मात्र कोणत्याही व्यक्तींची नावे उघड केलेली नाहीत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात १३५ जागा मिळवून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता.

भाजप आणि जेडीएस नेते समझोत्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांची बंगळूर अथवा नवी दिल्लीत बैठक होऊ शकली नाही आणि आता त्यांनी सिंगापूरची तिकिटे बुक केली आहेत. आमचे शत्रू आता एकत्र येऊन मित्र झाले आहेत. माझ्याकडे अशा लोकांची माहिती आहे जे सिंगापूरला फक्त कर्नाटकातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्लॅन रचण्यासाठी गेले आहेत, असेही उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे. (Karnataka Politics)

शिवकुमारांना का आली शंका?

या राजकीय घडामोडींवर जेडीएसने प्रतिक्रिया दिली आहे. "दोघांनी हातमिळवणी केली तरीही ते फक्त ८५ (जागा) मिळवू शकतील. त्यांना अजून ५० जागांची गरज आहे. तुम्हाला त्याची काळजी कशाला? आधी तुम्ही जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा… आमच्याकडे अशी कोणतीही (ऑपरेशन) योजना नाही. शिवकुमार यांना काही शंका असल्यास ते थेट माझ्याशी बोलू शकतात." असे सांगत जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष सीएम इब्राहिम (JD(S) State President CM Ibrahim) यांनी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news