Karnataka Mandya : ध्वजस्तंभ हटवल्याने मंड्या तालुक्यात तणाव

Karnataka Mandya : ध्वजस्तंभ हटवल्याने मंड्या तालुक्यात तणाव

मंड्या : पुढारी वृत्तसेवा : हनुमानध्वज हटवण्यात आल्याने मंड्या तालुक्यातील केरगोडी येथे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी यावेळी लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

अयोध्या येथील राममंदिर लोकार्पण आणि राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त केरगोडी येथे १०८ फुटी उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला होता. त्यावर हनुमान ध्वज फडकावण्यात आला. परंतु ध्वजस्तंभ उभारताना राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाला दिली होती. परंतु ग्रामस्थांनी हनुमान ध्वज फडकवला. यामुळे पोलिस प्रशासनाने ध्वजस्तंभ हटवला. याविरोधात गावकऱ्यांनी तालुका पंचायत अधिकाऱ्यां विरोधात आंदोलन केले. पुन्हा ध्वजस्तंभ उभारण्याचा प्रयत्न केला. याला पोलिसांनी अटकाव केला. त्यावेळी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्याला हिंसक वळण लागले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. त्यानंतर गावकऱ्यांनी मंड्या-यडियुर राज्यमार्ग रोखून धरला. काँग्रेसचे आमदार गणीग रविकुमार यांचे पोस्टर फाडले. रस्त्यावर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे ता. पं. अधिकाऱ्यांनी काही ग्रा. पं. सदस्यांसह ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकावला. याठिकाणी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी भेट देऊन निषेध व्यक्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news