कर्नाटकातील शिक्षेकेसोबत विद्यार्थ्यांनी वर्गातच धरला ‘हर हर शंभू’वर ठेका (Video Viral)

कर्नाटकातील शिक्षेकेसोबत विद्यार्थ्यांनी वर्गातच धरला ‘हर हर शंभू’वर ठेका (Video Viral)
Published on
Updated on

बंगळुरु; पुढारी ऑनलाईन : सध्या सर्वत्र 'हर हर शंभू' गाण्यावर एका शाळेत एक शिक्षिका आपल्या छोट्या विद्यार्थ्यांना डान्स शिकवतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवत असलेला डान्स पाहताना खूपच छान वाटते. शिवाय त्या शिक्षिकेच्या पाठीमागे हुबेहुब तशीच स्टेप मुले करताना दिसत आहे. हे गाणे आणि यावरील होणारा डान्स पहाताना आपण सुद्धा आपोआप ताल धरायला लागतो. यामुळेच हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओला पाहून कर्नाटकातील एका भाजप नेत्याने हा व्हिडिओ शेअर करत या उपक्रमास अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे म्हटले आणि असा उपक्रम सर्वच शाळांमधून राबविला जावा असे सुद्धा म्हटले आहे. हा व्हायरल होणारा व्हिडिओ कर्नाटकातील रायचूर जिल्हातील एका सरकारी शाळेतील असल्याचा सांगण्यात येत आहे. युजर्सकडून या व्हिडिओवर अत्यंत चांगल्या प्रतिक्रीया येत आहेत. सर्वांनी अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे अशा प्रतिक्रीया येत आहे.

व्हिडिओ बाबत तर्कवितर्क

मुळात हा व्हिडिओ कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या भाजपनेत्याने सुद्धा तशीच माहिती दिली आहे. पण, हा मुळचा व्हिडिओ कर्नाटकातीलच पण, उडुपी जिल्ह्यामधील खासगी शाळेतील असल्याची माहिती समोर येत आहे.

अनेक ठिकाणी या व्हिडिओची सत्यता पडताळली जात आहे. Scoonews वेबसाईटवर याबाबत एक बातमी देण्यात आली आहे. 20 जुलै 2020 रोजी प्रकाशित झालेल्या या बातमीत असे लिहिले आहे की, मंगळुरूच्या जेसी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका वंदना राय यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना नृत्याच्या माध्यमातून शिकवत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये शिक्षिका वंदना या इयत्ता १ लीच्या कन्नड पाठ्यपुस्तकातील 'चंदिर्नेटेक ओडुवनम्मा' या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

शाळा संपण्यापूर्वी वंदना या लहान मुलांना शास्त्रीय नृत्याच्या धडे देतात. शिक्षिका वंदना यांनी कन्नड वाहिन्यांवर अनेक रिअॅलिटी शो जिंकले आहेत. करकला येथे दोन नृत्य शाळा चालवण्यासोबतच त्या चेतना स्पेशल स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही देतात.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news