कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : भाजप, काँग्रेस बंडखोरांचा धजद प्रवेश

कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : भाजप, काँग्रेस बंडखोरांचा धजद प्रवेश
Published on
Updated on

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : माजी आमदार गुरु पाटील, दोड्डपगौडा पाटील, विधानपरिषदेचे माजी सदस्य रघु आचार यांच्यासह बंडखोरांनी भाजप आणि काँग्रेसला रामराम ठोकून निजदमध्ये प्रवेश केला. निजद नेते व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या उपस्थितीत पक्षाचे झेंडे दाखवत त्यांनी प्रवेश केला.

रघु आचार हे चित्रदुर्ग मतदार संघातून इच्छुक होते. दोड्डपगौडा पाटील हे जेवरगी मतदारसंघातून इछुक होते. मात्र भाजपने दोघांनाही डावलल्याने त्यांनी पक्षांतर केले. कारवारच्या चैत्रा कोटेकार, पावगडचे श्रीराम, भाजपचे वरीष्ठ नेते एच. आर. तिम्मय्या यांनीही निजदमध्ये केला. निजद प्रवेशप्रसंगी विधान परिषद सदस्य तिप्पेस्वामी, टी.ए. श्रवण, भोजेगौडा, राज्य कायदा विभागाध्यक्ष ए. पी. रंगनाथ आदि उपस्थित होते.. भाजपचे संख्याबळ आणखी घसरले विधानसभा निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्याने भाजपचे आमदार राजीनामे देऊन अन्य पक्षांत दाखल होत आहेत. या राजीनामासत्रामुळे ७५ सदस्यांच्या विधान परिषदेत बहुमत असलेल्या भाजपला बहुमत याआधीच गमवावे लागले आहे. आता आमदार लक्ष्मण सवदी यांचा राजीनामा स्वीकृत झाल्यानंतर हे संख्याबळ ३५ वर घसरणार आहे. वरिष्ठ सभागृहात ३९ सदस्यांसह भाजपने अनेक वर्षांनी प्रथमच बहुमत मिळवले होते. विधान परिषद सदस्य आर. शंकर यांच्या राजीनाम्यामुळे भाजपचे संख्याबळ ३६ वर आले होते.

आता दुसरे सदस्य लक्ष्मण सवदी यांनी राजीनामा दिल्याने भाजपची संख्या ३५ होणार आहे. सध्या विधानपरिषदेत भाजपची संख्या ३५ आहे तर काँग्रेस २६, निजद ८, अपक्ष एक, एक सभापती आणि तीन रिक्त जागा आहेत.

राष्ट्रवादी कर्नाटकात ४० ते ४५ जागा लढवणार

राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या ४० ते ४५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे. कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी ४० ते ४५ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देण्याचा पक्षाचा विचार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले. शरद पवार यांनी कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news